ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

जेष्ठ निरूपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणा निमित्त वृक्षारोपण…..

 

सुबोध सावंत :-मुंबई विभागीय प्रतिनिधी

तुर्भे, ता 7(इंडिया 24 न्यूज ):-आध्यात्मिक ते बरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने नवी मुंबई येथील महापे एमआय डी सी येथील श्री हनुमान गड येथे ठाणे वनविभागाच्या जागेत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन उपक्रम हाती घेण्यात आला होता .यावेळी 250 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने आणि पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ श्री अप्पासाहेब धर्माधिकारी डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने नवी मुंबई येथील महापे एमआयडी सी याठिकाणी रविवारी ता (7) वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन उपक्रम मान्यवरांच्या उपस्थिती पार पडले .
यावेळी ठाणे वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे यांच्यासह माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी नगरसेवक शिवराम पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, समाजसेवक नामदेव डाऊरकर आदी उपस्थित होते.


महापे वनपरिक्षेत्र हद्दीतील श्री हनुमान गड येथील पाच एकर पेक्षा अधिक जागेवर वड, पिंपळ, करंज, गुलमोहर, चिंच आदि वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी या उपक्रमा मध्ये नवी मुंबईतील 2743 श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमा अंतर्गत एकूण 250 झाडां पैकी 75 झाडांचे रोपण करण्यात आले. उर्वरित वृक्षारोपण हो टप्या टप्याने करण्यात येणार आहे.


चौकट,
माजी खासदार डॉ संजीव नाईक यांनी देखील या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा तर केली याशिवाय आज ज्या वृक्षा चे रोपण करण्यात आले आहे त्यांचे संवर्धन देखील शंभर टक्के होणार असा विश्वास व्यक्त करत पुढे म्हणाले की पुढच्या पिढी साठी काय केले हे म्हणण्या पेक्षा पुढच्या पिढी साठी हेच केले पाहिजे ते म्हणजे आपण जाताना काही घेऊन जात नाही त्यामुले जाताना एक झाड लावून जाऊ जेणेकरून पुढच्या पिढीला उपयुक्त ठरले जाईल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.