ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महिला उन्नती संस्था तर्फे कर्तत्ववान महिलांचा सन्मान..!!

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

वसमत : ( इंडिया 24 न्यूज ) – राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ,महिला उन्नती संस्था (भारत) नवी दिल्ली , या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ महिला सशक्तीकरण अभियान ‘ अंतर्गत ‘ नारी शिक्षा-सुरक्षा और सन्मान ‘ या हिंगोली जिल्ह्यामधील ‘ कर्तृत्ववान महिलांच्या सन्माना ‘ चा कार्यक्रम वसमत येथे दि. 5 जुलै 2024 रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे घेण्यात आला .
महिला उन्नती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल वर्मा व त्यांच्या टीम तर्फे यशस्वीरित्या राबविण्यात येत असलेला हा उपक्रम, महाराष्ट्रअध्यक्षा श्रीदेवी पाटील यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे .महिला उन्नती संस्थेचे महाराष्ट्र प्रभारी, ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय संजयकुमार कोटेचा यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे , महिला उन्नती संस्थेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष मदन(बापू) कोल्हे यांचे तर्फे आयोजन केले होते .
सर्वप्रथम डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारकामधी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्ती समोर मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संजय कुमार कोटेचा यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी हिंगोली जिल्ह्यातील महिला चळवळ व सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या महिलांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.महिला चळवळीमधील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रभावतीताई खंदारे, समाजहित जोपासत, शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या विनिताताई देशमुख , अडल्या -नडल्यांचे कामं करणाऱ्या समाजसेविका नेहा भुसावळे व समाज कार्याबरोबरच वृत्तपत्र क्षेत्रामध्ये आपले कर्तव्य बजावत असलेल्या ग्रामीण महिला पत्रकार अनिता चव्हाण यांचा महिला उन्नती संस्थेतर्फे प्रशस्तीपत्र , ‘नारी सन्मान पत्र ‘ देऊन गौरव करण्यात आला .
सामाजिक कार्यकर्त्या प्रभावती बाई खंदारे यांचा आज वाढदिवस असल्याने संजय कुमार कोटेचा यांनी वाढदिवसानिमित्त प्रभावती ताईंचे स्वागत करून वाढदिवसाच्या निमित्ताने स्मारक परिसरात बोधी वृक्षाचेरोपण करण्यात आले.उपस्थित मान्यवरां तर्फेही प्रभावती ताईंचे अभिष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


हिंगोली जिल्ह्यामधील सामाजिक कार्यकर्ते तथा तरुण पत्रकार बाळासाहेब भगवान कांबळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन महिला उन्नती संस्थेचे मराठवाडा विभागीय मीडिया पि.आर.ओ.तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे यांनी केले . याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद करवंदे, रविराज डोळसे, समाजसेवक सिद्धार्थ खंदारे ,ज्येष्ठ कार्यकर्ते काळे , मीडिया फोटोग्राफर पत्रकार नागराज एंगडे, पत्रकार रुपेश सरोदे आदी नागरिक व महिलांची उपस्थिती लाभली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.