ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी..

 

संपादक सौ. शिल्पा बनपुरकर

धुळे, दि. 11 जुलै, 2024 ( इंडिया 24 न्यूज ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, 21 जुलै, 2024 रोजी धुळे जिल्ह्यातील 8 केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राहुल जाधव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कुल, साक्री रोड, धुळे, जे.आर.सिटी हायस्कुल, एस.पी.ऑफिसजवळ, धुळे, जयहिंद हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज जयहिंद कॉलनी, देवपूर धुळे भाग अ, जयहिंद हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज जयहिंद कॉलनी,देवपूर धुळे भाग ब, के.एस.न्यु.सिटी हायस्कुल, महाराणा प्रताप चौक, धुळे,, जिजामाता कन्या विद्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, धुळे, कनोसा कॉन्वेट हायस्कुल, चाळीसगांव रोड, धुळे, श्री.छत्रपती शिवाजी हायस्कुल, गरुड कॉम्पलेक्स साक्री रोड,धुळे अशा 8 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार असून या परिक्षेस 3 हजार 552 विद्यार्थी प्रवेशित आहेत.

सदरच्या परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात रविवार, 21 जुलै, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 12.30 व दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तींस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधीत मनाई असेल असे आदेशात नमूद केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.