आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️वरोरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई राकेश सोनुने यांनी केली विष प्राशन..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) वरोरा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस शिपाई राकेश सोनुने हे कार्यरत होते. 13 जुलै 2024 ला गणवेशात कार्यरत होते. रात्री 09.30 वाजता विेष प्राशन केल्याची माहिती मिळताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना उपचारासाठी तत्काळ वरोरा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर. जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. जास्त ड्युटीचा भार असल्याने तणावात असल्याचे अशी चर्चा आहे. पोलीस शिपाई हा इंदिरानगर वार्ड मधील रहिवासी आहे. परंतु पोलीस सूत्राकडून विश्वसनीय अधिकची माहिती मिळू शकली नाही. पोलीस विभाग या घटनेचा तपास करीत आहे. असे सूत्राकडून कडले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.