आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️कचरा गाडीने होईल जल , वृक्षारोपण,पर्यावरण संरक्षण व अनेक जनजागृतीचे कार्य..!

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : येथील मागिल 28 वर्षांपासून वृक्षारोपण, पर्यावरण,जलसंवर्धन साठी कार्यरत वृक्षाई व इरई बचाव जनआंदोलनाच्या भुमी कुशाब कायरकर या 16 वर्षीय विद्यार्थिनीने केंद्रातील शहर विकास मंत्री व मंत्रालय सचिवांना पत्राद्वारे सूचना केली आहे की ज्याप्रमाणे कचरा गाडी द्वारे प्रत्येक घर-प्रतिष्ठानातं कचरा संकलित करुन व लाऊंड स्पीकर द्वारा जनजागृती करुन “स्वच्छ भारत” अभियान सफल करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे त्याच प्रमाणे जगाला भेडसावणाऱ्या वातावरण बदलाच्या व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला भविष्यात रोखथाम करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या “एक पेड मेरी माँ के नाम” व जलशक्ती मंत्रालयाच्या “जल संरक्षण “व शासनाच्या अनेक विभागाच्या जन-राष्ट्र हिताच्या योजनां ची जनजागृती कचरा गाडी द्वारे करण्याची विनंती भूमीने केली आहे.कचरा संकलन गाडी देशातील प्रत्येक घर,वार्ड,गाव,शहरात लाऊंड स्पीकर द्वारे जनजागृती करीत आहे,त्यात पर्यावरण-जल सारखे अनेक जागृतीचे रेकार्डिंग केली तर नावीन्यताने जनता आत्मसात करणार
हे प्रभावी कार्य निशुल्क,विना खर्च होईल कारण मागिल 10 वर्षात फ्लेक्स,ब्यानर,प्रसिद्धी च्या नावाने 23000 कोटी रुपये खर्च झाल्याने देशातील गरीब जनतेने gst व अन्य अनेक कराच्या रूपाने दिलेल्या पैशाचा जन कल्यानासाठीच उपयोग व्हावा न की कोण्या फोटोजीवी व्यक्ती साठी अशी भावना भूमीने व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.