आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तिन नविन क्रिमीनल कायद्याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे प्रियदर्शनी सभागृह येथे आयोजन..

 

श्री राजु शंभरकर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो नं. 9511673435

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : तिन नविन क्रिमीनल कायद्याबाबत दोन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तिन नविन क्रिमीनल कायद्याबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाचे प्रियदर्शनी सभागृह येथे आयोजन करण्यात आले. भारत सरकार यांनी ऑगष्ट 2019 मध्ये भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय पुरावा कायदाय 1872 या कायद्यामध्ये सुधारणा करुन नविन कायद्याच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. देशातील नागरिक, लोकप्रतिनिधी, नॅशनल लॉ-युनिवर्सिटी, विधी तज्ञ, सेवानिवृत्त न्यायाधिश, पोलीस अधिकारी यांच्या कडुन सुचना मागविण्यात आल्या. त्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 ही तीन विधेयके संसदे मध्ये सादर करण्यात आली. सन 2020 मध्ये गृह मंत्रालयाने डॉ.रणबिरसिंग यांचया अध्यक्षतेखाली सदर विधेयकांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली. त्यानंतर सुधारित विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होवून दिनांक 25 डिसेंबर, 2023 रोजी मा.राष्ट्रपती यांची त्यावर स्वाक्षरी झाली.
सदर तिन्ही कायद्याची अंमलबजावणी दिनांक 01 जूलै, 2024 पासुन लागु संपुर्ण भारत देशात लागू करण्यात आली आहे.

सदर तिन्ही क्रिमीनल नविन कायद्याबाबत चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महसुल विभागातील अधिकारी यांना माहिती व्हावी या दृष्टीकोणातून पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांचे संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशीक येथील विधी निदेशक अॅडव्होकेट संजयकुमार पाटील आणि अॅडव्होकेट राजेश सचदेव यांना मार्गदर्शनासाठी नाशीक येथुन बोलाविण्यात येवुन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी.सी. यांचे पुढाकाराने प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे आज दिनांक 13 जूलै, 2024 रोजी व दिनांक 14 जुलै, 2024 रोजी असा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सदर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा प्रियदर्शनी हॉल चंद्रपूर येेथे आज रोजी सुरुवात झाली सदर प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी.सी., पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, अपर जिल्हाधिकारी,चंद्रपूर, सर्व उपविभागीय अधिकारी, व तालुका दंडाधिकारी चंद्रपूर जिल्हा तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर जिल्हा, सर्व पोलीस निरीक्षक यंाचे सह विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकुण 1200 लोकांची उपस्थिीती होती.
नविन तिन क्रिमीनल लॉ बाबतचा सदर प्रशिक्षण कार्यशाळा इतक्या मोठया संख्येने घेण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.