आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या मुलमंत्रांची समाजातील प्रत्येक घटकाने आत्मसात करण्याची गरजेचे..

▪️काँग्रेसनेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन..!

 

*🔹श्री. नामदेव धर्मा डोंगरे*
*🔹गडचिरोली जिल्हा उपप्रतिनिधी*
*🔹मो नं. 9403692432*

अहेरी – ( इंडिया 24 न्यूज ) : महामानव व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित,वंचित आणि पिढीत समाजाला शिका,संघटित व्हा अन् संघर्ष करा,असे मूलमंत्र दिले असून समाजातील प्रत्येक घटकांनी या मुलमंत्राची आत्मसात करण्याची आज नितांत गरजेचं असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अहेरीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.

ते अहेरी येथील बस आगाराकडून आयोजित जागतिक आदिवासीं दिनाचे कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस पक्षाचे आदिवासीं आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी आणि बस आगाराचे प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना कंकडालवार म्हणाले,आज आदिवासीं समाज खूपच मागासलेला आहे.या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे आहे.समाजातील नागरिक वेगवेगळ्या पक्षाशी बांधिलकी असले तरी समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मात्र वज्रमूठ बांधून एकत्रित यावे.समाजाच्या सामाजिक कार्यक्रमात कोणीही राजकारण न आणता समाजाची एकता आणि समाजाच्या समतोल हितासाठी संघटित होऊन योग्य पाऊल उचलण्याची अत्यंत गरजेचं असल्याचेही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कंकडलवार यांनी म्हंटले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले काँग्रेस पक्षाचे आदिवासीं आघाडीचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांनी उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले.जागतिक आदिवासी दिनाचे कार्यक्रमाला बस आगाराचे अधिकाऱ्यांसह चालक – वाहक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.