आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️वेडसर महिलेवर बलात्कार करून चित्रफित प्रसारमाध्यमावर प्रसारित करणार्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या..

▪️मनसेच्या महिलासेना बल्लारपूर तालुकाध्यक्ष सौ. कल्पना पोर्तलावार यांची पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी..

 

*🔹श्री राजु शंभरकर*
*🔹चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔹मो नं. 9511673435*

चंद्रपूर : ( इंडिया 24 न्यूज ) : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढले असून महिलांना घराबाहेर पडने देखील धोक्याचे झाले आहे मानवतेला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली या घटणेनी संपूर्ण राज्य हादरला सर्वत्र निषेध व आक्रोश सूरू असतांनाच परत काहिदिवसांपूर्वी नागभीड येथील एका मानसिक रुग्न असलेल्या महिलेंवर बलात्कार करून ती चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आली असून समाजमन सुन्न करणारी घटना घडली आहे आपण या गुन्हेगारा विरुद्ध कठोर कारवाई करून यांना फासावर चढवावे ज्यामुळे अशा घटना पून्हा घडणार नाहीत आणि कुणी राक्षसीवृत्ती हिम्मत देखील करणार नाही यावर लवकरात लवकर ठोस पाउले उचलावी अन्यथा मनसे महिला सेना आक्रमक आंदोलन करणार या आशयाचे निवेदन मनसेच्या महिला सेना चंद्रपूर माजी जिल्हाध्यक्षा सौ. सूनिता गायकवाड ,मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधानसभा) मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या नेतृत्वात मनसे महिलासेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा सौ. कल्पना पोर्तलावार यांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात मनसेचे शुभम वांढरे, मंगेश धोटे, अर्चना आमटे, राज वर्मा, कुंताताई येरमुडे, सरला दुर्गे, निक्की यादव, उज्वल तेलतुमडे तथा मनसेचे कार्यकर्ते व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.