आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️साकेगाव येथे पुंण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुऊद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने कलाकारांचा भव्य मेळावा संपन्न..!

 

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

अहमदनगर / साकेगाव – ( इंडिया 24 न्यूज ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे अहिल्यादेवी होळकर बहुऊद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने कलाकारांचा भव्य मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केडगावचे बापुसाहेब भोर, कर्जत येथील गीरी महाराज, नागलवाडीचे सुदाम महाराज, तपनेश्वर महाराज, भगवान महाराज चन्ने, शिवाजी महाराज चन्ने,दिनकर महाराज गवळी, भास्कर महाराज देशमुख, श्रीधर महाराज लोखंडे, अण्णासाहेब गुंड, पुष्पा मुटकुळे, लताबाई बोरुडे हे उपस्थित होते. प्रारंभी आलेल्या कलाकारांची गावातून सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती. रेणुकामाता मंगल कार्यालयात या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मार्तंड महाराज तोगे यांनी आलेल्या कलाकारांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानधना विषयी माहिती सांगितली.तसेच प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील आलेल्या कलाकारांना मानधना साठीचे फाँर्म देऊन सर्व कागदपत्रे पुर्ण करून फायली पुन्हा जमा करण्यासाठीच्या योग्य सुचना देण्यात आल्या आहेत. साकेगावच्या सरपंच सौ.अलकाताई सातपुते यांचे पती अँडव्होकेट चंद्रकांत सातपुते यांनी अहिल्यादेवी प्रतिष्ठान ला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.एकूण 28 प्रकारचे कलाकार या मेळाव्यासाठी हजर होते.अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मांन्यवर कलाकारांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने किर्तनकार, प्रवचनकार, शिवशाहीर, गायनाचार्य,म्रुदुंगाचार्य,भारुड, तबला, ढोलकी, खंजेरी,संबळ, डफवादक,ढोल,ताषा, डफडे वादक,बँड,सनई,डोंबारी, पोतराज, वासुदेव, आरादी,बासरी, चोपदार, महिला कलाकार, हार्मोनियम, समाज प्रबोधनकार, ईत्यादी कलाकारांचा समावेश होता.यावेळी व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक साहेबराव सातपुते, माजी सरपंच सुधाकर डांगे,सिताराम डांगे, जालिंदर डांगे, आबासाहेब सातपुते
सुखदेव मर्दाने,हे उपस्थित होते. सुत्रसंचालन रामदास सातपुते यांनी तर आभार वसंत बोर्डे यांनी मानले. संपूर्ण तालुक्यातून आलेल्या कलाकारांना प्रिती भोजन देण्यात आले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.