आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सिंदेवाही येथे काँग्रेसचे “निर्धार महाराष्ट्राचा’ प्रशिक्षण शिबिर संपन्न..

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थीती..

*🔻श्री. अरविंद चहांदे*

*🔻चंद्रपूर तालुका उप प्रतिनिधी*

*🔻मो. नं. 9405714165*

सिंदेवाही – ( इंडिया 24 न्यूज ) :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर राज्यातील त्रिकूट सरकार कडून होत असलेली राज्यातील नागरिकांची कुचंबणा व लूट थांबविण्यासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात जनजागरण होणे करिता आज सिंदेवाही येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्धार महाराष्ट्राचा प्रक्षिक्षण शिबीर संपन्न झाले.

आयोजित प्रशिक्षण शिबिरास राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार, तर मार्गदर्शक म्हणुन स्वप्निल फुसे, ॲड. मोनाली अपर्णा, ऋषल हिना, काँग्रेस जिल्हा सचिव हरिभाऊ बारेकर, काँग्रेसचे जेष्ठ बाबुराव गेडाम,काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, उपाध्यक्ष पूजा रामटेके, कृउबा उपसभापती दादाजी चौके,माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी उपनगराध्यक्ष मयूर सूचक, तथा तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी महिला आघाडी, नगरपंचायत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सर्व,पदाधिकारी व सर्व काँग्रेस सेल पदाधिकारी, बूथ प्रमुख, बीएलओ, व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी देशातली मनुवादी व व्यापारी हित जोपासणाऱ्या विचारांच्या सरकारचे सर्व सामान्यांप्रती असलेले विघातक धोरण, देशांत वाढत चाललेली धार्मिक तेढ, शेतकऱ्यांची फसवणूक व त्यांची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती याचा देशाच्या लोकशाहीवर,अर्थव्यवस्थेवर होणारा दुषपरिणाम, यामुळे राज्य व देशांत माजलेली अराजकता, देशावर वाढलेले कर्जाचे डोंगर, दिवसागणिक शाळकरी मुली,महिलांवर होणारे अत्याचार, वाढती महागाई,आणि यातून होणारी सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.

देश वाचवायचा असेल तर संविधानावर घाला घालू पाहणाऱ्या मनुवाद्यांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय पर्याय नाही असे आवाहन अध्यक्षीय भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित शिबिरार्थिंना केले. आयोजित शिबिरास सिंदेवाही व सावली तालुक्यांतील बूथ प्रमुख, बीएलओ तथा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.