आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*घुग्गुस शहरातील भूस्खलन प्रकरणी वनमंत्री श्री मुनगंटीवार यांनी दिली घटनास्थळाला भेट*

*इतरत्र हलविण्यात आलेल्या कुटुंब प्रमुखांना मुख्यमंत्री सहायता निधितुन प्रत्येकी 10 हजार रु मिळणार* *भाजप तर्फे प्रत्येकी 3 हजाराची मदत*

 

जिल्हा प्रतिनिधी -: अरुण माधेशवार.

घुग्गुस शहरातील भूस्खलन प्रकरणी जमीनित गेलेल्या घरानजीकची जी घरे सावधानीचा उपाय म्हणून इतरत्र हलविण्यात आली त्या कुटुंब प्रमुखांना मुख्यमंत्री सहायता निधितुन प्रत्येकी 10 हजार रु चे अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच भारतीय जनता पार्टी तर्फे प्रत्येकी 3 हजार रु. ची मदत या कुटुंब प्रमुखांना देण्यात येणार आहे.
आज दि. 27 ऑगस्ट रोजी वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस शहरात भुस्खलनाची घटना घडली त्या ठिकाणी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला .यावेळी त्यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत याविषयी माहिती दिली. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विनंती नुसार मुख्यमंत्र्यांनी संबंधित कुटुंब प्रमुखांना 10 हजार रु चे अर्थसहाय्य मुख्यमंत्री निधितुन देण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेवून उपाययोजनेची दिशा निश्चित करू असेही श्री मुनगंटीवार म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगळे , विवेक बोढ़े आदी भाजप पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने , वेकोली चे महाप्रबंधक श्री आभास सिंग , डीजीएमएस चे अधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.