आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*गुंजेवाही तान्हापोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला*

*दर्शकांसाठी रंगभूषा व वेशभूषा आकर्षित ठरली*

 

जिल्हा प्रतिनिधी -: अरुण माधेशवार.

चंद्रपूर :- ( इंडिया 24 न्यूज ) : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील गांधी चौकातील हनुमान मंदिराच्या पटांगणात मोठया थाटामाटात तान्हापोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.कोरोनाच्या काळात हा उत्सव साजरा करता आला नाही. सिंदेवाही तालुक्यात गुंजेवाही येथे बैल पोळा आणि तान्हापोळा प्रसिद्ध आहे. ही परंपरा गावकऱ्यांनी कायम ठेवण्याचे काम केले आहे.
आदल्या दिवशी याच ठिकाणी बैलपोळा सण शेतकरी बंधूनी उत्सहात साजरा केला.येथे गावातील सर्व बैलांची पुजा करण्यात आली. त्या नंतर गावातील हनुमान मंदिर येथे मिरवणूक काढून आपआपल्या घरी नेऊन पूजा करून अन्न खाऊ घालण्यात आले .दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा गुंजेवाही येथील ग्रामपंचायत कार्यालयात शँकर, राम लक्ष्मण, हनुमान ही रंगभूषा व पारंपरिक वेशभूषा करून हेच सॊदर्याचे प्रतीक ठरून प्रेक्षकांचे मने जिकंली या सर्व तरुणांनी बेभामपणे नृत्याचा आस्वाद घेतला.नाना विविध वाद्यांच्या तालासुरात गावातुन नंदीबैलाचा स्वागत करीत हर हर महादेव च्या गजरात शांत वातावरणात गावातील तरुणानी एकोपा निर्माण करून सहकार्य करीत शेकडो तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालय,महामाई चौक ते मेन रोड गांधी चौक येथील हनुमान मंदिर पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी परिसरातील जनता जनार्धन यांनी आपल्या परिवार सह नदीबैल घेऊन तान्हापोळ्याची शोभा वाढविण्याचे काम केले.या वर्षी तान्यापोळ्यात 675 नंदीबैलांनी हजेरी लावली होती.प्रत्येक नंदीबैलांना प्लास्टिकच्या कुंड्या आणि खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ही प्रथा कायम ठेवली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनियुक्त मा. सरपंच तथा सदस्य गण ग्रामपंचायत कमेटी,नवनियुक्त मा. अध्यक्ष तथा सदस्य गण तंटामुक्त समिती व नवनियुक्त मा. अध्यक्ष तथा सदस्य गण वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गुंजेवाही येथील तरुण वर्गानी सहकार्य केले.हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील नागरिक आणि महिलांवर्गानी व बालगोपालांनी मोठय़ा संख्येने भाग घेऊन कार्यक्रमाचा आंनद घेतला…

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.