आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️जुन्या वैमनस्यातून युवकाची हत्या…

♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माणी चांदा वसाहतीच्या हद्दीत येणाऱ्या पिपरबोडी या भागात एका युवकाची दि.28 ऑगस्ट (रविवार) ला संध्याकाळच्या वेळेस धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. सुरज शेट्टी रा.पिपरबोडी असे या मृत झालेल्या युवकाचे नाव आहे,आणि हत्या करणाऱ्याचे नाव रमेश शेट्टी रा. पिपरबोडी आहे.
माहितीनुसार सुरज शेट्टी याने काही वर्षांपूर्वी रमेश शेट्टीच्या नातेवाईकाची हत्या केली होती, त्याचाच सुड म्हणून रमेश शेट्टीने सुरज शेट्टी याची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी रमेश शेट्टीला अटक केली असून पुढील तपास करीत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.