ताज्या घडामोडीदेश विदेश

*धम्मासंस्कार वर्गाचे प्रशिक्षक भन्ते अश्वजित यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन*

मुख्य संपादक -: श्री. तुळशीराम जांभुळकर.

धम्मसंस्कार वर्गाचे प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्रभर ओळख असलेले भन्ते अश्वजित यांचा सध्या भुसावळ येथील गांधीनगर बुद्ध विहारात वर्षावास/धम्मसंस्कार वर्ग सुरू आहे. या दरम्यान, दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी अचानक त्यांची तब्बेत बिघडल्याने त्याना गोदावरी हॉस्पिटल (भुसावळ – जळगाव खा. हायवे) येथे भरती करण्यात आले आहे. प्रथमोपचारानंतर त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस होत आहे. त्यांच्या उपचारासाठी अनेकांनी आर्थिक मदतीसाठी फोन केले आहेत. ज्या उपासक-उपसिकांना भन्ते अश्वजित यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत द्यायची असल्यास त्यांनी भन्ते अश्वजित यांच्या फोन पे नंबर /गुगल पे9673292297 यावर पाठवून त्यांच्या उपचारामध्ये खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन उपासक विष्णू शेजवळ, भुसावळ मो. ७४१०७८४२८८ यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.