आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*घुगुस शहरातील वाढते प्रदूषण व कामगारांच्या समस्यांना घेऊन उलगुलान संघटनेचे धरणे आंदोलन*

राकेश काबंळे

विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

मो.9890979418

*वाढते प्रदूषण व परिसरातील कामगारांची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन तीव्र करणार:- राजु झोडे*

*घुगुस:-* घुगुस हे शहर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराच्या आसपास कोल माईन्स, सिमेंट कारखाने तसेच इतर मोठे मोठे उद्योग आहेत. यामुळे या शहरातील प्रदूषणाची समस्या प्रचंड प्रमाणात गंभीर झालेली आहे. तसेच स्थानिकांना रोजगार न मिळाल्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. वाढती प्रदूषणाची समस्या व स्थानिक कामगारांच्या समस्यांना घेऊन उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी घुगुस येथे उलगुलान कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन तीव्र धरणे आंदोलन केले.
घुगुस शहर मागील अनेक वर्षापासून प्रदूषणाच्या विळख्यात असून आशिया खंडात सर्वात प्रदूषित शहर म्हणून हे शहर ओळखले जाते. या शहरात मोठ्या संख्येने लोक राहत असून प्रदूषणामुळे अस्थमा, हार्ट अटॅक व इतर भयंकर बिमारीचा सामना मागील अनेक वर्षापासून करावा लागत आहे. शहरातील हवा पूर्णपणे विषारी झालेली असून शासन व प्रशासनाचे तसेच काँग्रेस बीजेपीच्या सत्ताधाऱ्यांचे निव्वळ मलिदा खाण्यातच लक्ष आहे. या जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार घुगुस शहरातील वाढती बेरोजगारी व प्रदूषणाकडे लक्ष न देता यांचे लक्ष निव्वळ उद्योगपत्यांकडे व कारखानदारांकडे आहे असा आरोप राजू झोडे यांनी धरणे आंदोलनात केला. स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य असताना येथील कारखानदार व कोलमाईन्सचे प्रशासन बाहेरून परप्रांतीय कामगार आणतात व येथील बेरोजगारांवर अन्याय करतात. हा अन्याय घुगुस शहरातील नागरिकांना येथील सत्ताधाऱ्यामुळे सहन करावा लागत आहे. यावर तात्काळ आळा बसला पाहिजे व येथील नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे या मागणीला घेऊन उलगुलान कामगार संघटनेने शहरात धरणे आंदोलन केले व आंदोलनाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाचे तसेच येथील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. वाढते प्रदूषण व कामगारांच्या समस्या सोडविल्या नाही तर उलगुलान कामगार संघटना याहीपेक्षा आक्रमक पवित्रा घेणार व जिल्हा कचेरीवर या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला. सदर धरणे आंदोलनात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, श्यामभाऊ झिल्लपे, कामगार संघटनेचे शहराध्यक्ष अमित कुंभारे, मोहम्मद अली, पप्पू सोदारी, हंसराज लांडगे, चिरंजीवी मेडसेल्ली,हनिफ सिद्दीकी,अभीषेक घोडषेलवार, नुरुद्दीन शेख तथा शहरातील नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.