आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नेताजी हायस्कूल शाळेला आधी भेट द्या नंतर निर्णय घ्या

▪️खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना..

 

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभूळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : राज्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे मराठी शाळेकडे पालकांनी व विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा पटसंख्येच्या कारणाखाली बंद करण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे. वरोरा येथील जिल्हा परिषद नेताजी हायस्कूल शाळा कमी पटसंख्येच्या कारणाखाली बंद करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आहे. त्यावर पुनर्विचार करण्याकरिता शाळेला आधी भेट द्या नंतर निर्णय घ्या अशा सूचना खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला यांना केल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेन्द्र लोखंडे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर चहारे तसेच वरोरा येथील नेताजी हायस्कूल शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती.

वरोरा येथील जिल्हा परिषद नेताजी हायस्कूल शाळेत इयत्ता ५ वी ते १० पर्यंत वर्गात ४२ विद्यार्थी शिक्षण आहेत. बोर्डा गावापासून इतर शाळा ५ किमी दूरवर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण वाढणार असून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या निर्णयावर पुनर्विचार होण्याची गरज असल्याची तक्रार पालक करीत होते. त्याची दखल घेत आज जिल्हा परिषद चंद्रपूर येथे बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावण्यासाठी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी व पालकांच्या सूचनांच्या विचार करून या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.