आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथे..

▪️" महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा प्रशिक्षण शिबिर संपन्न "

 

*♦️राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक*

वरोरा- ( इंडिया 24 न्यूज ) : आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन,यांचे महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ अंतर्गत आयोजित ” महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या ” सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.या संबंधाने प्रशिक्षण शिबिर घेऊन यासंबंधीचे आनंद निकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ही स्टार्टअप यात्रा २ सप्टेंबर २०२२ रोज शुक्रवारला आनंद निकेतन महाविद्यालय,आनंदवन,वरोरा येथे सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत येत आहे. या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मृणाल काळे,कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा.राजू महाजन, प्रमुख उपस्थिती, महाविद्यालयीन समन्वयक नीरज आत्राम,प्रा. राधा सवाने,प्रा. रमेश पळसुटकर, प्रा. गालकर प्रा. नितीन बारेकर,प्रा.सीमा नगरारे,प्रा.मानसी काळे,व्ही.आर.आत्राम,प्रा मंडल,प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.” विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य, कला आणि ज्ञान विकसित करून बेरोजगारांना रोजगाराच्या संबंधाने सतत प्रोत्साहित केले पाहिजे ” असे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी सांगितले. तसेच मार्गदर्शक प्रा. राजू महाजन यांनी “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८” आणि महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांनी तथा बेरोजगारांनी सामोरे यावे असे आवाहन केले.” महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेसाठी स्पर्धक नोंदणी सुरू आहे. तरी इच्छुकांनी महाविद्यालयात येऊन समन्वयकांशी संपर्क साधावा. अशाप्रकारे सर्व योजना सविस्तरपणे समजावून सांगितले. ,प्रा मंडल, प्रा.सचिन लोहकरे,प्रा.व्ही पि.गजरे,नव उद्योजक,जितेश कायरकर,प्रशांत ढेंगळे यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक नीरज आत्राम यांनी केले. तर या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रा. रमेश पळसुटकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन बारेकर यांनी केले. या शिबिराला विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.