आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️देशमुख समाज मंडळाच्या अध्यक्षपदी संजय देशमुख (निंबेकर) तर सचिवपदी अश्विन देशमुख..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभूळकर

कार्यकारणीत के.व्ही.देशमुख, सौ.कल्पना देशमुख उपाध्यक्ष तर वसंतराव देशमुख कोषाध्यक्ष तथा यशवंत देशमुख सहसचिव
अकोला : अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाच्या  घटनात्मक पध्दतीने नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.त्यानंतर या नुतन कार्यकारिणीच्या झालेल्या प्रथम सभेत  पत्रकार संजय माणिकराव देशमुख निंबेकर यांची अध्यक्षपदावर अविरोध निवड करण्यात आली.याच अविरोध पध्दतीने त्यांचेसोबत सचिव म्हणून अश्विन अमृतराव देशमुख तर उपाध्यक्ष पदावर  के.व्ही.देशमुख,डोंगरगांवकर व सौ.कल्पना प्रदिपराव देशमुख यांची निवड झाली.
सहसचिव म्हणून यशवंत विठ्ठलराव देशमुख तर कोषाध्यक्ष म्हणून  वसंतराव गुलाबराव देशमुख यांची निवड करण्यात आली.एकून १७ पदाधिकाऱ्यांच्या या कार्यकारिणीत सदस्य म्हणून वसंतराव वामनराव देशमुख,कविताताई साहेबराव ढोरे,राजाभाऊ देवीदासराव देशमुख,प्रा.संजय भाऊराव देशमुख,राजाभाऊ बाबाराव देशमुख,संजय कृष्णराव देशमुख,सौ.नयनाताई गजेन्द्र देशमुख,योगेश शिवराव देशमुख,हरिष बाबूराव देशमुख,नितीन लक्ष्मणराव देशमुख,व अंकुश अवचितराव तंवर यांची निवड करण्यात आली आहे.
समाज विकासाच्या विधायक विचारांनी सामंजस्यपूर्वक सभासदांची मते जाणून घेऊन घटनात्मक बाबींचे पालन करीत ही वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष कृष्णराव माधवराव देशमुख( डोंगरगावकर ) यांचे अध्यक्षेखाली घेण्यात आली.जुण्या मंडळातील १७ पैकी ३ पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने ह्यात पदाधिकारी १४ होते.त्यापैकी मावळत्या अध्यक्षांसह एकून १३ पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.त्यामुळे एकतर्फी निर्भेळ बहूमताने ही वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली होती.
अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाच्या सुलभ वाटचालीत जाणून बूजून खोळंबा करून सामाजिक सेवा आणि विकासाच्या कार्यात अडचणी निर्माण करण्यासाठी अनेक खोट्या नाट्या कारनाम्यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न केले जात होते.त्या षडयंत्रांना न जुमानता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसंमतीने अगोदरच्या कार्यकारिणीचे सहसचिव व विद्यमान अध्यक्ष संजय देशमुख यांचेकडे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रक्रियेचा कार्यभार एका ठरावानुसार सोपविला होता.
त्यानुसार प्रक्रिया राबवून मावळत्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली,आणि पदाधिकाऱ्यांनी एकमताने अध्यक्षांसह सर्व कार्यकारिणी तयार केली.याबाबतचा बदल अर्जसुध्दा मा.सहाय्यक धर्मदाय आयुक्त अकोला यांचेकडे दाखल करण्यात आलेला आहे.त्यामुळे यापूढे वधू- वर परिचय मेळावे व पुस्तिका प्रकाशनापासून सर्व उपक्रम नवे समाज मंडळ राबविणार आहे.म्हणून मेळावे आणि पुस्तक प्रकाशनाबाबत सोशलमिडीयामधून पसरविल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या  पोस्टवर समाजबांधवांनी विश्वास ठेऊ नये.असे आवाहन अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाच्या नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.