आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

◼️धानल्यात आमदंगल, मंडई उत्सवाची धूम..!

◼️ग्रामीण भागात दिवाळीचा उत्साह :विविध कार्यक्रमांचे आयोजन..

♦️निखिल श्रावनकर

♦️मौदा तालुका प्रतिनिधी
♦️मो. नं. 9923231481

मौदा -(इंडिया 24 न्युज ):दि. 26 ऑक्टोंबर 2022 ला तालुक्यातील धानला येथे परंपरागत कुस्त्यांची दंगल व मंडई उत्सवानिमित्त आमदंगल व रात्री ला संगीत खडा तमाशाचे आयोजन ग्रामपंचायतने केले होते. पश्चिम महाराष्ट्रात कुस्ती हा खेळ लोकप्रिय आहे. त्या भागात कुस्तीला राजाश्रयासह लोकाश्रय सुद्धा मिळाला आहे. यामुळेच येथील कुस्तीपटू आंतरराट्रीय स्तरावर कामगिरी करण्यात यशस्वी ठरले आहेत. हि कुस्त्यांची परंपरा मौदा तालुक्यातील धानला गावाने कायम ठेवली आहे. धानला येथे यंदा कुस्त्यांच्या दंगलीत पहेलवानांची खूप गर्दी पाहायला मिळाली.कुस्त्यांची अनेक वर्षांपासूनची परंपरा या भागात जपली जात आहे. या कुस्त्यांच्या दंगलीचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांचा हस्ते झाला. या प्रसंगी आमदार टेकचंद सावरकर, जि. प. चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, सभापती स्वप्नील श्रावणकर, सरपंच वनिता वैद्य, ज्ञानेश्वर वानखेडे, तुळशीराम काळमेघ, राजेंद्र लांडे, राजेश ठवकर, राजेश निनावे, भूषण सावरकर, मनोहर वैरागडे, नारायण पत्रे, रमेश चौहान, चक्रधर गभणे, हिराचंद वैरागडे, मनीष मते, आदी उपस्थित होते.
कुस्त्यांची दंगल आणि दंडार हा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ग्रामीण भागात चालणारा हा एक मनोरंजनाचा प्रकार आहे. त्याला लोकप्रियता अधिक असल्यामुळे गावकरी, तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने पाहुण्यांची गर्दीसुद्धा पाहायला मिळाली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.