आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️शासकीय शाळा बंद करू नये म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपक भाई केसरकर यांच्याबरोबर महत्त्वाची बैठक..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

कोल्हापूर (इंडिया 24 न्यूज )कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य अधिवेशनाला शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दीपक भाई केसरकर यांना निमंत्रित करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे कोल्हापूर ,सिंधुदुर्गचे शिक्षक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून मंत्री महोदयांची भेट घेतली . मंत्री महोदयांनी कोल्हापूर येथील राज्यस्तरीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारलेलं आहे.त्याचबरोबर शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवरती काल अनौपचारिक बरीच चर्चा झाली. या चर्चेमधला मुख्य विषय होता.
० ते २० पटसंखेच्या आतील शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार आहे असं समजले. ० ते २० पटसंख्या असलेल्या राज्यातील विविध जिल्हा परिषद शाळा बंद करू नये असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन करण्यात आलं. या निवेदनाला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी अशा कुठल्याही प्रकारचा निर्णय शासनाने अजून घेतलेला नाही. आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेने दिलेल्या मुद्द्यांचा विचार शासन स्तरावर नक्की केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही याची पूर्णतः हमी मंत्री महोदयांनी दिली.
त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ केली जाईल , दारिद्य्र रेषेखालील मुलींचा उपस्थिती भत्ता ५ रू केला जाईल आणि त्यासाठी लवकरच सामाजिक न्याय विभागाशी बैठक आपण मंत्रालयामध्ये घेऊ असं आश्वासन दिले मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांवरती कास्ट्राईब शिक्षक संघटनेसोबत लवकरच मंत्रालयामध्ये बैठक घेतली जाईल.
राज्यातील केंद्रप्रमुखांच्या भरती बाबत प्रश्न विचारला असता मंत्री महोदयांनी केंद्रप्रमुखांची भरती येत्या चार महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल तसेच शिक्षण सेवकांची भरती प्रक्रिया सुद्धा लवकरच पूर्ण केली. मागासर्गीयांचा भरती मधील अनुशेष भरला जाईल. जाईल असे ठोस आश्वासन दिले.

राज्यातील शिक्षण सेवकांचं मानधन हे जवळपास दुपटीने वाढविले असल्यामुळे शिक्षण मंत्री मा.ना.दीपक केसरकर यांचं विशेष अभिनंदन कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून करण्यात आले.

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेत (NEET, JEE Main & JEE Advanced )महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा आणि आणि त्यातून पुढे नामवंत वैद्यकीय महविद्यालयामध्ये ( AIIMS दिल्ली ), इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट ( IIT) प्रवेश मिळावा.यासाठी अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनाने किमान दहावी बारावीच्या विज्ञान शाखेसाठी एन सी आर टी ( NCERT) चा अभ्यासक्रम लागू करावा.

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत राज्यात अव्वल स्थानी सिंधुदुर्ग जिल्हा असतो मात्र पुढे स्पर्धात्मक शिक्षणाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले संधी अभावी मागे पडतात. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेसाठी ( NEET,JEE) शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावे. तरच सिंधुदुर्ग जिल्ह्या शैक्षणिक दृष्ट्या विकासाचं रोल मॉडेल बनेल. अशी भूमिका आकाश तांबे यांनी मांडली.
त्यावर मंत्री महोदयांनी या बाबींवरती आपण विचार केलेला असून पुढील काळामध्ये याचे रिझल्ट बघायला मिळतीलअसे सांगितले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संजय कुर्डूकर , कोषाध्यक्ष पी. डी. सरदेसाई, विजय कांबळे, सिंधुदुर्गचे जिल्हा सचिव किशोर कदम ,डॉ. पारस जाधव (देवगड कॉलेज) , सुधीर तांबे( मुख्याध्यापक ,नांदगाव हायस्कूल), रमाकांत जाधव ( चळवळीतील ज्येष्ठ नेते) इत्यादी शिक्षक मंडळी उपस्थित होते.

आकाश तांबे
सरचिटणीस
कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.