आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भाजपा प्रदेश कार्यालयातील सेवकांना दिवाळीनिमित्त मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप…

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुबंई :- (इंडिया 24 न्यूज )२८ ऑक्टोबर २०२२  नरीमन पाॅईंट येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातील सेवकांना “कामगार मोर्चा” च्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांच्या हस्ते दिवाळी निमित्त मिठाई आणि भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव, डाॅ. प्रिताताई व्हिक्टर, हनुमंत लांडगे प्रदेश सदस्य मंगेश चव्हाण, अविनाश देवकर, राजेश सोनवणे हे उपस्थित होते.

कामगार मोर्चा शिष्टमंडळाने प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी, सहसचिव भरत राऊत यांची विशेष भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

प्रदेश कार्यालयातील अधिकारी, काॅम्पुटर ऑपरेटर, लिपिक, मिडीया सेल कर्मचारी, टेलिफोन ऑपरेटर, वाहनचालक, सहाय्यक, वाॅचमन, सफाई सेवक म्हणून कार्यरत असणा-या अशा ५९ जणांनी मिठाई आणि भेट वस्तूंचा स्विकार करुन कामचार मोर्चाचे आभार व्यक्त केले.

भाजपा आणि मोदींचा “श्रमेवजयते” हा
विचार अंत्योदय पर्यंत पोहविण्यात कामगार आघाडी कटिबद्ध आहे. अशी भावना कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी व्यक्त केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.