आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

◼️ इजनी येथे मंडईचे उदघाटन. ◼️ कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांचा हस्ते पार पडले

♦️निखिल ब.श्रावणकर

♦️मौदा तालुका प्रतिनिधी
♦️मो.न. 9923231481

मौदा -( इंडिया 24 न्युज ):-दि. 01 नोव्हेंबर 2022 :- मौदा तालुक्यातील इजनी येथे आयोजित दोन दिवसीय मंडई उत्सवाला मंगळवारी सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे उदघाटन कामठी -मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांचा हस्ते पार पडले.
दुपारी सर्व प्रथम दंडारी च्या माध्यमातून लोककला सादर केली.

या वेळी मुख्य अतिथी म्हणून रामटेक -पारशिवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या राधाताई अग्रवाल, माजी पं.स. सदस्य मुकेश अग्रवाल,सामाजिक कार्यकर्ता श्रीहरी थोटे, प्रमुख पाहुणे म्हणून गट ग्रा. पं. धर्मापुरी सरपंच सविता भिवगडे, उपसरपंच शैलेंद्र ( बाबा ) थोटे,पोलीस पाटील धनराज थोटे, टेकाडे मॅडम, मंडई कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिक थोटे, उपाध्यक्ष टेकचंद थोटे, सचिव अनिल नेवारे,कोषाध्यक्ष गौरव दिवे,सहसचिव राकेश पां.थोटे, दिपक श्रावणकर, संजय क्षिरसागर,नितीन पालटकर, सुरज थोटे, रोशन थोटे, धनराज डांगरे, अक्षय थोटे, नारायण जर्वेकर, आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते.
मंडईत मंगळवारी रात्रीला गोंधळ सादर झाले तर बुधवारी तमाशाचे सादरीकर होईल. या मंडईच्या माध्यमातून इजनी गावात पाहुण्यांची रेलचेल असून गावकऱ्यांना या माध्यमातून कार्यक्रमाची पर्वणी मिळाली आहे. या वेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.