ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

शिक्षणाधिकारी लोहार यांच्यावर कारवाई बाबत अहवाल राज्य शासनास सादर.

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

सोलापुर (इंडिया 24 न्यूज )दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी २५,०० रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लोहार यांच्यावर कारवाई सुरू आहे.
दरम्यान शिक्षण उपसंचालक यांच्याकडून प्राथमिक अहवाल तातडीने पाठविण्यात यावा असे कळविण्यात आले होते,
त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक अहवाल शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठविला होता.
दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालानुसार दिनांक
३ नोव्हेंबर २०२२ रोजी तातडीने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
शिक्षण संचालक पुणे व
शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा
(वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चा भंग केल्याने त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा
(शिस्त व अपिल) मधिल नियम ४ नुसार कारवाई करण्यात यावी असा अहवाल पाठविण्यात आला आहे.

शिक्षणाधिकारी हे वर्ग एकचे अधिकारी असून त्यांचे नियुक्ती प्राधिकारी राज्य शासन आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी या नात्याने राज्य शासनास आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल प्राप्त होताच तातडीने पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनास पाठविला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.