आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*नवरगाव मधील ब्रेकर देत आहे अपघातास आमंत्रण*

*माता चौक नवरगाव ते रमाबाई हाल गिरगाव रोड नवीन बांधकाम*

 

अमोल निनावे
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9764271316

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील मेन बसटॉपचे नवरगाव ते गिरगावच्या रोडचे बांधकाम झाले आहे. मात्र जवळ जवळ दोन मोठे ब्रेकर एकच ठिकाणी दिले असल्याने व तो उंच तसेच कोणतेही चिन्ह किंवा रंगरोटीन केल्याने सरळ येणारे मोठे वाहतूक तसेच छोटे वाहतूक करणारे प्रवाशी यांचा अपघात झालेला आहे असे अनेक वेळा लोकांच्या निर्दशनास आलेला आहे . त्यामुळे हा ब्रेकर बेकायदेशीर बनवलेला असून त्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. एकतर ब्रेकर हा खूप उंच असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचे प्रमाण वाढण्याची श्यकता आहे त्यामुळे नवरगाव वाशीय जनतेची मागणी आहे कि या ब्रेकरचे बांधकाम रुंद करावे किंवा मग त्याला काढून छोटा ब्रेकर करावे. तसेच रोडच्या बाजूला गटू लावली नसल्याने अनेक मोठे वाहतूक रोडच्या बाजूला घेऊन जातात व आपल्या गाडीचे अपघात घडवीत असतात त्यामुळे या कडे प्रशासनाने लक्ष्य देऊन योग्य रोड व ब्रेकर बनवावे अशीं मागणी जोर धरीत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.