आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी.. ▪️शाळेत २७०पेक्षा अधिक मुलांना दिनांक १ नोव्हेबर पासून आरटीई चे विद्यार्थी ईतर मुलांसोबत वर्गात बसवले जात आहेत. आप पालक युनियन च्या प्रयत्नाला यश..!

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

एस एन बी पी शाळेत गेले दोन वर्षापासून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेले वंचित व दुर्बल घटकातील मुलांना वेगळ्या वर्गात बसवले जात असल्याची तक्रार यांनी आप पालक युनियन ने विभागीय उप संचालक उकिरडे यांचेकडे केली होती. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शिक्षणाधिकारी नायकडे यांनी सुनावणी घेतली होती. तसेच प्रसार माध्यमातून आवाज उठवला होता. त्याची दखल घेत शाळेने पालकांकडून वर्ग बदलण्यासंदर्भात अर्ज मागून घेतले व त्याप्रमाणे इतर मुलांसोबत आरटीई च्या मुलांना आता बसवले जात आहे. आज पालकांनी एकत्र भेटून आप पालक युनियन यांचे आभार मानले. तसेच आता मुलांना विविध उपक्रमांमध्ये खेळांमध्ये सामील करून घेतल्यास जात असल्याने समाधान व्यक्त केले.
२७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे वर्ग बदलून देण्यात आले आहेत व दुपार ऐवजी सकाळी वर्गात बसवले जात आहे अशी माहिती शाळा मुख्यध्यापक यांनी दिली.

– मुकुंद किर्दत, समन्वयक, आप पालक युनियन

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.