आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️पोलीस भरतीसाठी नवी जाहिरात ९ नोव्हेंबर २०२२ ला, १५ हजार पदांसाठी होणार भरती..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

पुणे ः- (इंडिया 24 न्यूज )राज्य शासनाने करोना संसगामुळे पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दिलासा दिल्यानंतर आता १५ हजार पदांची पोलीस भरतीची नव्याने जाहिरात दि. ९नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
त्यामुळे भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अखेर सुटकेला नि:श्‍वास सोडला आहे.

पोलीस शिपाई भरतीची जाहिरातबाबतची सविस्तर माहिती ९ नोव्हेंबर २०२२ ला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीसच्या संकेतस्थळावर भरतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
त्यानंतर दोन दिवसांत या जाहिरातीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता.
त्यामुळे आता नव्याने पोलीस भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल,
याविषयी उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.