आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️संविधानातील कलम ३४० बाबत संविधान जनजागरण मोहीम..

▪️२६ नोव्हेंबर संविधान दिन पासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशभरात मोहीम राबविणार - डॉ. बबनराव तायवाडे

संपादक – शिल्पा बनपूरकर

चंद्रपूर,दि.८ ( इंडिया 24 न्यूज ) : येत्या २६ नोव्हेंबर पासून संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने “ संविधान दिनी जागरण मोहीम “ संपूर्ण भारतभर राबविणार येणार असल्याची घोषणा अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली आहे. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित देशव्यापी ऑनलाईन झूम बैठकीमध्ये सहभागी पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी लोकांना संबोधित करताना बोलत होते. ही बैठक सोमवार दि. ७ नोव्हेंबरला रात्री ७ ते १० दरम्यान डॉ. तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
डॉ.तायवाडे पुढे म्हणाले कि, भारत देशातील ओबीसी प्रवर्गात सामाविष्ट असलेल्या हजारो जाती-जमातींमधील लोकांना शिक्षण, उच्चशिक्षण, प्रशासन व अन्य संवैधानिक सुविधांबाबत प्रतिनिधित्व बहाल करण्यासाठी संविधानातील कलम ३४० नुसार संवैधानिक आरक्षणाची तरतुद करण्यात आलेली आहे. परंतु मागील ७३ वर्षांपासून या देशात संविधानाच्या नावावर सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांनी मात्र या देशातील ओबीसी लोकांचे संवैधानिक अधिकार नाकारण्यासाठी अनेक निर्बंध लादून ओबीसी लोकांची सर्व क्षेत्रात प्रचंड कोंडी केलेली आहे. त्यामुळे ओबीसी लोक खूप मागासलेले आहेत. ओबीसी लोकांना त्यांना असलेले संवैधानिक अधिकारांची माहिती, ज्ञान व त्यामुळे मिळणाऱ्या अधिकारांची जाणीव नसल्यामुळे ते या देशात इतर लोकांच्या तुलनेत प्रचंड मागे पडले आहेत. यासाठी संवैधानिक अधिकारांची जाणीव वाढविण्यासाठी ओबीसी लोकांमध्ये संविधान जागरण मोहीम राबविण्याची अत्याधिक गरज आहे व ती मोहीम राष्ट्रीय ओबीसी महासंघ येत्या २६ नोव्हेंबर पासून पुढे एक आठवडाभर संपूर्ण देशात राबविणार आहे. हा उपक्रम राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सतत राबविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या झूम बैठकीची भूमिका स्पष्ट करतांना महासचिव सचिन राजूरकर यांनी संपूर्ण भारत देशातील विविध राज्यात ही संविधान जागरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. याची सुरवात नागपूर जिल्ह्यातील ९ तालुक्यात सतत ९ दिवस संविधान जागरण मेळावे घेवून करण्यात येणार आहे. यात जवळपास २२०० इतक्या संविधान पुस्तिकेचे वाटप ओबीसी लोकांमध्ये करण्यात येणार आहे. हे सर्व संविधान ग्रंथ एससी प्रवर्गातील बांधवांनी देणगी म्हणून दान दिले असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी दिली असल्याचे राजूरकर यांनी यावेळी सांगितले. या दरम्यान संविधान प्रास्ताविका, कलम ३४० व मुलभूत अधिकारांशी निगडीत कलमांचे सार्वजनिकरित्या सामुहिक वाचन तसेच संविधान जागरणावर अभ्यासकांचे प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे येथे तर बार्टी या संस्थेच्या सहकार्याचे संविधान पुस्तिकेचे सवलतीच्या दारात वाटप करण्यात येणार आहे. तसेच संविधान जागरणाचे अन्य उपक्रम सुध्दा राबविण्यात येणार आहेत. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, जालना, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक इत्यादी विविध जिल्यातील नागरी व ग्रामीण परिसरात सुध्दा अशीच मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातही हा उपक्रम जोरात साजरा करण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पं.महाराष्ट्र, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र इत्यादी महाराष्ट्र राज्यातील प्रदेशात ही मोहीम जोरकसपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती राजूरकर यांनी यावेळी दिली. तसेच आसाम, बिहार, गुजरात, पंजाब, गोवा, तेलंगना, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड व दिल्ली इत्यादी विविध राज्यातही ही संविधान जागरणाची मोहीम येत्या २६ नोव्हेंबर या संविधान दिनी संविधान पुस्तिकेचे वाटप व कलम ३४० आणि संविधान प्रस्तविकेचे सामुहिक वाचन करून राबविण्यात येणार असल्याची माहिती व आराखडा सचिन राजूरकर यांनी कळविला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध आघाड्या महिला, युवा, युवती, विधार्थी, कर्मचारी- अधिकारी, किसान व वकील महासंघ याद्वारे सुध्दा ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
सहसचिव शरद वानखेडे यांनी कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक सूचना मागविल्या व सुचविल्यात. जवळपास तीन तास चाललेल्या या झूम बैठकीत संपूर्ण देशातील प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समनवयक डॉ अशोक जीवतोडे ,महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कल्पना मानकर, युवा आघाडीचे सुभाष घाटे, मुकेश नंदन (बिहार), प्रवीण वानखेडे, डॉ. अनिल अमालकर,कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, भटू नेरकर, विलास बाबरे, ,निलेश संकपाळ (सांगली), अनिल नचपल्ले, एकनाथ तरमाळे, विजय डवंगे, चेतन शिंदे, (पुणे), ज्योती चौधरी (धुळे), ज्योती ढोकणे, राजू चौधरी, परमेश्वर राऊत यांनी चर्चेत सहभागी होवून विविध सूचना केल्यात. या झूम बैठकीत महिला आघाडीच्या सुषमा भड, रेखा बाराहते,समीक्षा गणेशा, प्रतिभा चौधरी,दिनेश चोखारे नरेंद्र लाखडे, योगेंद्र कटरे, नरेंद्र भोयर,मंगला देशमुख, भारती कलाल, नरेश साव प्रिन्स राजकुमार (बिहार), सुभाष पाटील, भारत नाचिते,राधेश्याम महाले, हिरालाल पाटील (लातूर), राजेश राहाटे, संतोष भोजने, नयना झाडे,लीनाकटरे,स्वाती वाणी, रेखा सुडे मनोज मेंढे,रुषभ राऊत विनोद हजारे, पंकज खोबे, रोशन कुंभलकर,रोहित हरणे, उजवला महल्ले,
अनिल ठाकरे, विनोद उलीपवार, आशिष तायवाडे, निशा खडसे यांच्यासह विविध ओबीसी लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी सर्व सहभागी ओबीसी बांधवांचे आभार संजय मांगे यांनी मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.