आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️घणसोली नोड मध्ये मोकळ्या भूखंडावर टुरिस्ट कंपनीची अवैधरित्या पार्किंग..

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी.

नवी मुंबई : ( इंडिया 24 न्यूज ) : खासगी टुरिस्ट कंपनीची सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या पार्किंग. घणसोली येथील सेक्टर ४ मध्ये भूखंड क्रमांक ए ११८ ( शिवम सोसायटी ) च्या बाजूच्या मोकळ्या भूखंडावर एका टुरिस्ट कंपनीने आपली वाहने उभ्या करण्यासाठी वाहन तळ उभारण्याचा पराक्रम केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमनविरोधी भरारी पथकाच्या निदर्शनात ही बाब येऊ नये याचे विशेष वाटत आहे.ह्या जागेचे भाडे नक्की कुणाला मिळत आहे की पालिकेच्या कुणा अधिकाऱ्याला ते भाडे मिळत आहे याचा खुलासा संबंधित विभागाने करावा. सामान्य भाजी विक्रेता पदपथावर भाजी विक्रीसाठी बसला तर त्याला अनधिकृत ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि इथे अवैधरीत्या पार्किंग करणाऱ्या टुरिस्ट कंपनीला अभय दिले जाते. जर सदर कंपनी महानगरपालिकेला भाडे देत असेल तर किंवा महानगरपालिकेने ती जागा वापरण्याची परवानगी सदर कंपनीला दिली असेल तर तशी माहितीफलक लावण्यात का आली नाही, तसेच ती जागा कोणाला भाडेतत्वावर कोणत्या कंपनीला दिली आहे याचा खुलासा

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.