ताज्या घडामोडी

▪️मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा प्लान , दाऊदने पाकमधून पाठवला ‘डर्टी मनी’ , आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबईः (इंडिया 24 न्यूज )दाऊद इब्राहिम आणि त्याचा निकटवर्तीय छोटा शकीलबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन.आय.ए.) या तपाससंस्थेने मोठा खुलासा केला आहे.
दाऊद टोळीने मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी रोख रक्कम पाठवली होती.
ही रक्कम पाकिस्तानातून दुबईमार्गे सूरत व नंतर मुंबईत पोहोचवण्यात आली होते. मुंबईतील आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांना मुंबईत दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी आणि कारवायांसाठी २५ लाखांची रक्कम देण्यात आली होती,
असा दावा एन.आय.ए.नं केला होता.
एन.आय.ए.नं दाऊद, शकील, मोहम्मद सलीम कुरैशी उर्फ सलीम फ्रूट यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे. त्याचबरोबर रक्कमेची देवाण-घेवाण करण्यासाठी एका ‘डर्टी मनी’ हा कोड वर्डचा वापर करण्यात येत होता.

शब्बीरने आरिफच्या सांगण्यावरुन हवालामार्फत
२९ एप्रिल रोजी मालाड पूर्वमधून ही रक्कम घेतली होती.
दहशतवादी कारवायाविरोधात दाखल असलेल्या चार्जशीटमध्ये एन.आय.ए.ने ६ साक्षीदारांचे जबाब नोंद केले आहे.
मागील चार वर्षांत हवालामार्फत देशात १३-१४ कोटींची रसद पुरवली गेली.
रशीद मारफानी उर्फ रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचे काम करत होता,
जेणेकरून वॉण्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना दुबईत भारतात पाठवणे शक्य होईल.
या रकमेच्या व्यवहारासाठी कोड वर्ड वापरण्यात आला होता एन.आय.ए.ने आपल्या चार्जशीटमध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांसाठी २५ लाख रुपये कसे पाठवले होते,
हे स्पष्ट केले आहे.
एन.आय.ए.ने केलेल्या दाव्यानुसार, शब्बीरने ५ लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. एन.आय.ए.ने सांगितले की हे लक्षात घेण्यासारखे आहे की
ए-2 (शब्बीर) कडून ९ मे २०२२ रोजी त्याच्या घरावर करण्यात आलेल्या जप्तीदरम्यान ५ लाख रुपये जप्त करण्यात आले होते.
पैसा दोन्ही बाजूंनी भारतातून फायनान्सर्सकडे जात होता.
यात विशेषत: खंडणीच्या पाच स्वतंत्र घटनांची यादी केली आहे. एकामध्ये, आरिफ आणि शब्बीर यांच्यामार्फत हवाला मार्फत एका दशकात साक्षीदाराकडून सुमारे १६ कोटी रुपये उकळले गेले, असं एन.आ.ए.नं आरोपपत्रात नमूद केलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.