ताज्या घडामोडी

पगार मोठा, तरी लाचेचा आवरेना मोह! दहा महिन्यांत ९३२ जण लाचखोरीत अडकले..

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

सोलापूर :(इंडिया 24 न्यूज )दरमहा न चुकता वेळेवर हजारो, लाखोंचे वेतन मिळत असतानाही
१ जानेवारी ते ६ नोव्हेंबर २०२२ या काळातील ६४७ लाच प्रकरणात तब्बल ९३२ जण अडकले आहेत.
झटपट पैसा कमावून श्रीमंत होण्याचे स्वप्न आणि त्यासाठी गैरमार्गाने पैसा कमाविण्याचा मोह कारणीभूत असल्याची स्थिती आहे. राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व नांदेड असे आठ विभाग आहेत. त्यातील पुणे विभागात यंदा सर्वाधिक लाच प्रकरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

महसूल, पोलिस, शिक्षण, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका असे विभाग अव्वल आहेत.
ज्या विभागांमध्ये लोकांचा थेट संपर्क जास्त,
त्याच ठिकाणी लाच घेण्याचे तथा मागण्याचे प्रकार वाढले आहेत. काम करून देण्याचा कालावधी ३० ते ९० दिवस असतानाही मुद्दाम त्रुटी काढून ‘चर्चा करा’ असा शेरा मारला जातो. तसेच खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना देखील गुपचूप पैसे घेतले जातात. त्याची जास्त वाच्यता कुठे होत नाही आणि दुखावलेले कर्मचारी सेवेत असल्याने उघडपणे बोलू शकत नाहीत. पण सध्या रीतसर काम होत असतानाही अडवणूक केली जाते. चुकीचे काम करण्यासाठी पैसे मागितले जातात. भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा होत असतानाच लाच घेण्याचे वाढलेले प्रकार चिंताजनक आहेत. आई-वडिलांचा अन्‌ मुलांचा नक्की विचार करा. संघर्षमय परिस्थितीशी सामना करून अनेकजण शासकीय नोकरी मिळवतात. त्यानंतर काही महिन्यांत किंवा वर्षांनी त्याला झटपट पैसे कमावण्याचा मोह आवरत नाही आणि लाच प्रकरणात अनेकजण अडकतात.

अशा लोकांनी किमान आपल्या भरोशावरील आई-वडील, मुले, पत्नीला समाजात फिरताना काय वाटत असेल ? याचा तरी किमान विचार करावा. घरातून सकाळी मोठ्या ऐटीत ड्यूटीवर गेलेला पिता किंवा आई, भाऊ-बहिण, मुलगा लाच घेताना पकडला तर कुटुंबियांना काय वाटेल ? याचा विचार केल्यास निश्चितपणे लाचेची प्रकरणे कमी होतील, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी व्यक्त केला. तक्रारीसाठी पुढे या, नक्की लाच घेणे थांबेल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे फेसबूक पेज (लाँच कंम्पलेंट) असून त्यावर पण थेट तक्रार करता येते.

तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर पण तक्रार करता येईल. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळ असून त्यावर पण तक्रार करता येते, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी केले आहे.
*लाच प्रकरणाच्या स्थितीवर थोडेसे. दहा महिन्यांत लाच घेतल्याप्रकरणी ६४७ गुन्हे लाच प्रकरणात अडकले ९३२ सरकारी नोकरदार अडकले पुणे विभागात सर्वाधिक १३४ गुन्हे, नाशिक विभागात १०७ गुन्हेलाच प्रकरणात ६२९ सापळे अन् अपसंपदाचे सात गुन्हे. महसूल विभागातील १५३, पोलिस १३९ अन्‌ महापालिका, जिल्हा परिषद, शिक्षण विभागातील ७० प्रकरणे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.