▪️माझ्या अंगणातील अतिक्रमित वालकंपाउंड हटवावे..
▪️पत्रकार परिषदेतुन धनराज वासेकर यांची मागणी..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : मौजा चामोर्शी येथील नगर भुमापन क्रं 876 मधील एकूण जागा 90.60 चौ. मिटर असून यापैकी 144 चौ. फूट जागा ही मंदिरासहित जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा चामोर्शी पार्टी नं 1च्या 51 सभासदांना माझे मोठे वडील श्री. नारायण बुधा वासेकर यांनी सामाजिक कार्यकारिता 20वर्षांपूर्वी दानपत्र म्हणून मंदिरासहित 144 चौ फूट जागा दिली आणि उर्वरित जागा ही आपली देखभाल केली म्हणून स्वतःची भाची सौ. सुमन शंकर भांडेकर रा. भोगणबोडी 36 यांना स्वतःहून विक्रपत्र करून दिली होती पण मी धनराज गणपती वासेकर 2025 मध्ये सौ. सुमन शंकर भांडेकर रा. भोगणबोडी 36 यांचेकडून खरेदी केली असून दान दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेवर जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा पार्टी नं 1च्या 51 सभासदांनी मला कोणतीही पूर्वसूचना न देता सदर जागेवर रात्री 11:00 वाजता नशापानी करून बळजबरीने जाळीचे कंपाउंड केले मी माझ्या घराचे बांधकाम सुरु केले असून मला नाहक त्रास देण्यासाठी जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा पार्टी नं 1 च्या 51 सभासदानी जाणूनबुजून हा वालकंपाउंड केल्यामुळे माझा घरी ये -जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे.
नगरपंचायत चामोर्शी कडून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सदर मंदिराच्या परिसरात हँडपंप (बोअर ) मारून दिले आहे यावेळी मा.आमदार डॉ.मिलिंद नरोटे साहेब गडचिरोली विधानसभा क्षेत्र सदर भेट दिली त्यावेळी जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा पार्टी नं 1 चामोर्शी च्या 51 सभासदांना सांगितले की वालकंपाऊंड करू नका तरी यांनी मुजोरीने रात्री 11:00वाजता कोणतीही सूचना न देता हे जाळीचे वालकंपाऊंड केले आहे.या सर्व प्रकरणामुळे मला व माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असून या मंडळाकडून मला व माझ्या परिवाराच्या जीवास काहीही त्रास होऊ शकतो जर असे काही घडल्यास जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा पार्टी नं 1चे सर्व सभासद जवाबदार असतील.
मला या पत्रकार परिषदेतून संबंधित जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा पार्टी नं 1 च्या सभासदांना एवढेच सांगायचे आहे की माझे मोठे वडील श्री. नारायण बुधा वासेकर यांनी मंदिरासहित 144चौ फूट जागा ही त्यांना दानपत्र करून दिलेली आहे व उर्वरित जागा ही मी श्री नारायण बुधा वासेकर यांची भाची सौ. सुमन शंकर भांडेकर रा. भोगणबोडी 36 यांचे कडून विक्रीपत्रद्वारे घेतली आहे. पण माझ्या घरासमोरील खुल्या जागेवर केलेले अतिक्रमीत जाळीचे वालकंपाउंड हटवावे म्हणून ही पत्रकार परिषदेत आपली मागणी करीत आहे.
सदर जागा ही आम्हाला श्री नारायण बुधा वासेकर यांनी 144 चौ फूट ही समाजकार्य करिता जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा पार्टी नं 1 चामोर्शी ला दान दिली असून आम्ही तेवढ्याच जागेवर वालकंपाउंड केले असून जास्त जागा असल्यास आम्ही त्यास परत करू.वालकंपाउंड करताना सदर व्यक्ती धनराज वासेकर व त्याची पत्नी उपस्थित होते आम्ही कोणताही नशा पाणी करून नव्हतो त्याचे सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत. माणिकचंद कोहळे सचिव
जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा पार्टी नं 1 चामोर्शी.