▪️फायर लाईन व बांबू बंडल कटाईची मजुरी थकीत..वन मजुरांची मजुरी त्वरीत द्यावे..
▪️वनपरिक्षेत्र कार्यालय चीचपल्ली यांना निवेदन देऊन दिले चेतावणी आंदोलन उभारु - साईनाथ लोनबले सामाजिक कार्यकर्ता

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्युज) : मुल तालुक्यातील केळझर व पोंभूर्णा तालुक्यातील सातारा (तुकुम) येथील वनमजूर यांनी बीट क्र.४३६ मधील जंगलात २५ /०१ /२०२५ पासून फायर लाईन चे व जलाईचे काम केले. तसेच सातारा (तुकूम) येथील वनमजूर यांनी मार्च २०२५ मध्ये बांबू बंडल कटाईचे काम केले. सदर वनक्षेत्र हा चिचपल्ली वनपरीक्षेत्र यात येतो. प्रत्येक वन मजुरांची कमी अधिक १० ते १५ हजार रूपये वन मजूरी थकीत आहे. अनेकदा सबंधित वन विभागाकडे थकीत वन मजूरीची मागणी करण्यात आली. परंतू अजूनही वनमजुरांची मजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला व पुरुष वन मजुरांवर उपासमारीची पाळी आली असून कुटुंबाचे उदर निर्वाह कठीण जात आहे.
सबंधित वनकामगारा़ंची मजुरी एका आठवड्यात अदा न केल्यास वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली समोर आंदोलन व उपोषन करण्यात येईल असे केळकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.साईनाथ लोनबले यांनी कळविले आहे.