▪️प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानातंर्गत शेवगे येथे लाभाचे वाटप..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
धुळे – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 26 जून, 2025 प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानातंर्गत साक्री तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, शेवगे येथे लाभ वाटप शिबिर मोठया उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर तहसिलदार दत्ता शेजुळ होते. त्यांनी धरती आबा जन भागीदारी अभियानाचा उद्देश, आदिवासी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्य विषयक सर्वांगीण विकास साधणे हा असून या अभियानाच्या माध्यमातून शासन थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियानाचे आयेाजन केले असल्याचे सांगितले. या अभियानांतर्गत यावेळी लाभार्थ्यांना जातीचे दाखले, रहिवासी दाखले, रेशन कार्ड, घरकुल मंजुरी प्रमाणपत्र आदी महत्त्वाची कागदपत्रे वितरित करण्यात आली. तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास सरपंच उज्वलाताई गोटू चौरे (शेवगे), नानासाहेब जिजाऊ भदाणे (वीरखेल), ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवक मोतीराम पवार, विस्तार अधिकारी श्री.महाले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकल्प शामकांत पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जे.पी. देवरे, श्री आदिवासी विकास निरीक्षक डी.आर. पाटील, मंडळ अधिकारी प्रमोद गोलाईत, ग्रामसेवक श्री. घुगे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग उपकेंद्र शेवगे, सामाजिक वनीकरण क्षेत्र, महिला बालकल्याण विभाग तसेच परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अनुसूचित जमातीच्या सर्व पात्र घटकांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानातंर्गत जिल्ह्यात आयोजित ठिकाणी शिबिरात सहभाग नोंदवून शासकीय सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. असे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.