ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️रिजनल मॅनेजरला थेट इशारा – अन्याय थांबवा, नाहीतर उद्रेक अटळ..!

▪️पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना तात्काळ कामावर रुजू करून घ्या..!

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

कोल्हापूर – ( इंडिया 24 न्युज ) : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा – अंकली येथील अनुसूचित जातीतील पीडित कर्मचारी श्री. ऋषिकेश राजू कांबळे यांच्यावर झालेल्या बेकायदेशीर, अमानवी व संविधानविरोधी अन्यायाविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने युनियन बँक ऑफ इंडिया, रिजनल कार्यालय, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे जाऊन “सिबिल प्रधान” असिस्टंट जनरल मॅनेजर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निर्णायक इशारा दिला.

न्यायासाठी उपोषण – पण बँक प्रशासन मुग गिळून गप्प!

शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले की, पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे हे २६ नोव्हेंबर – संविधान दिनापासून लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन करत होते. मात्र, युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा – अंकली येथील शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने, १० डिसेंबर – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनापासून कांबळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

बँकेच्या दारात अनेक दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर, अमानवी व संतापजनक असल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट शब्दांत मांडले.

अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यावर अन्याय = संविधानावर हल्ला

अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यावर करण्यात आलेला हा अन्याय भारतीय संविधान, मानवी हक्क व सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा थेट अपमान असून, ही बाब केवळ कामगार प्रश्न नसून गंभीर सामाजिक गुन्हा असल्याचे यावेळी ठामपणे अधोरेखित करण्यात आले.

🔹 वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्ह्याच्या शिष्टमंडळाच्या ठाम मागण्या :

▪️ पीडित कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांना तात्काळ कामावर रुजू करावे
▪️ संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निपक्ष व उच्चस्तरीय चौकशी करावी
▪️ अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांचे संविधानिक हक्क अबाधित ठेवावेत
▪️ आमरण उपोषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मानवीय हस्तक्षेप तात्काळ करावा
▪️ उपोषणादरम्यान कांबळे यांच्या जीवितास व आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यास शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे हे वैयक्तिकरित्या जबाबदार धरावे
▪️ त्यांच्या आजवरच्या बेकायदेशीर कारभाराची खातेनिहाय चौकशी करून सेवा पुस्तिकेत तशी नोंद घ्यावी

🔹 वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने स्पष्ट इशारा – न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन!

जर पीडित कर्मचाऱ्याला तात्काळ न्याय मिळाला नाही, तर युनियन बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस, कोल्हापूर समोर तीव्र, निर्णायक व उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट आणि ठाम इशारा यावेळी देण्यात आला.

👥 शिष्टमंडळात उपस्थित पदाधिकारी :

🔹 संजय गुदगे – जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर
🔹 सतिश दुधगावकर – जिल्हा उपाध्यक्ष
🔹 सदाशिव बडगेर – कोल्हापूर शहर उपाध्यक्ष
🔹 तुळशीदास धनवडे – शाखा अध्यक्ष
🔹 वंचित बहुजन युनियनचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित

“बहुजनांवरील अन्याय सहन केला जाणार नाही – न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही!”

असा लढाऊ निर्धार वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी यावेळी व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.