आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️विसापूर – आमगाव रस्त्यावर जीवघेणा प्रवास.. प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : विसापूर – आमगाव रस्त्यावर आमगाव गावातून नालीद्वारे येणारे पाणी नेहमी साचून राहत असल्यामुळे सदर रस्ता अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.तळोधी ते आमगाव जाणारा रस्ता डांबरीकरण असून रस्त्यावर ठिकठिकाणी खडे पडले आहेत. विसापूर वरून पोहार नदीच्या पलीकडे आमगाव गावाजवळ गावातील नालीद्वारे येणारे पाणी नेहमीच साचून राहत असल्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकाना चिखलाशी सामना करावा लागत असून वाहन स्लिप होऊन अपघाताची दाट शक्यता दिसून येत आहे. रस्त्यावरील विशाल खड्डे पाहता प्रशासनाने जाणीवपूर्वक नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा ठराव घेतला आहे का ? असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे. सदर रस्त्याने शेतकरी, कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच इतर दुचाकी व चारचाकी वाहने चोवीस तास सुरू असतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने खड्ड्यात जाऊन फेकले जात असल्यामुळे वाहनांचे तुकडे होत आहेत. पावसाळ्यात खड्डे पाण्याखाली येत असल्याने रस्ता पूर्णपणे गायब होतो. रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्ता नाही तर मृत्यूचा जाळा सापडत असतो. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून प्रशासनाला अपघाताचे बळी हवेत का ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावरील खड्डे तात्काळ खड्डे बुजविण्यात येऊन रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.