आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बनावट नोटा प्रकरणातील फरार आरोपी पिरेवाडीचा अंकुश वसंत आघाव याच्या पाथर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या..!

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

पाथर्डी – ( इंडिया 24 न्युज ) : राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या दिवशी मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी भल्या पहाटे ४ वाजता पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की बनावट नोटा तयार करणे, जवळ बाळगणे,व इतर अनेक गंभीर गुन्ह्यात अनेक वर्षांपासून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला संशयित आरोपी अंकुश वसंत आघाव (वय ३५ वर्षे) हा आपल्या राहत्या घरी पिरेवाडी,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथे आला आहे.मग त्यांनी तातडीने पोलिसांचे एक पथक तयार करून त्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव, ज्ञानेश्वर ईलग,ईजाज सय्यद,सागर बुधवंत यांचा समावेश करून ते पथक पिरेवाडी येथे पाठवून दिले. गावात पोलिस आल्याची चाहूल लागताच फरार आरोपी अंकुश आघाव हा अंधाराचा फायदा घेऊन जोरात पळत सुटला.परंतू पाथर्डी पोलिसांनी कार्य तत्परता दाखवून त्याचा दोन किलो मीटर अंतरावर पाठलाग करून त्याला शिताफीने रंगेहाथ पकडले. व त्याला पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याच्या विरोधात किती गुन्हे दाखल आहेत हे तपासले असता अंकुश वसंत आघाव याच्या विरोधात पुढील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. [१] गुन्हा रजीस्टर नंबर १२४/२०१४, भादवी कलम ३२४,३२५,५०४, ५०६.[२] गुन्हा रजीस्टर नंबर ३८९/२०१४ भादवि कलम ३२३,३२४,५०४, ५०६.[३]सन २०१७ सालातील भादवी कलम ३२४,३६३,३६६, ५०४,५०६, [४] सातारा येथील मल्हार पेठ पोलिस स्टेशनमधिल गुन्हा रजीस्टर नंबर ६३/२०२५ भारतीय न्याय संहितेचे कलमं १७९,१८०,१८१, ३१८,(२).[५] पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २०/२०२६ भारतीय न्याय संहितेचे कलमं ११५(२),११९(२),३५१(२) प्रमाणे इत्यादी गुन्हे दाखल झालेले आहेत.या दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर हे करीत आहेत. पकडलेल्या संशयित फरारी आरोपीस पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.सदर गुन्ह्याचा तपास करून सदर आरोपीस पोलीसांनी पाथर्डी येथील न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे. सदर आरोपीच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील मल्हार पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२५ भारतीय न्याय संहितेचे कलमं १७९,१८०,१८१, ३१२,(२) प्रमाणे बनावट नोटा तयार करणे, जवळ बाळगणे, व्यापारी वर्गाची फसवणूक करणे या बाबत गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यात तो फरार झाला होता.तर त्याचा साथीदार सातारा जिल्ह्यातील मल्हार पेठ पोलिस स्टेशनमध्ये अटक केलेला आहे.सदर आरोपी विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये वरील प्रमाणे नमूद दाखल गुन्ह्यात त्याला पाथर्डी न्यायालया तर्फे अटक वॉरंट निघालेले असुन तो सदर गुन्ह्यांमध्ये गेली दहा वर्षे फरार झाला होता. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलिस कॉन्स्टेबल,महेश रुईकर,ज्ञानेश्वर ईलग,पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव,पोलिस कॉन्स्टेबल इजाज सय्यद, पोलिस कॉन्स्टेबल सागर बुधवंत यांच्या पथकाने केली आहे.अंकुश वसंत आघाव हा अतिशय सराईत गुन्हेगार असून तो गुंड प्रवृत्तीचा आहे.तो रस्त्यावर लुटमार करण्यात अतिशय कुख्यात तरबेज डॉन आहे. २३ जानेवारी २०२२ रोजी त्यांने पिरेवाडी गावात प्रवेश द्वाराजवळ उंच माथ्यावर बांधकाम केले असलेल्या एका मंदिरातील सप्ताहाच्या निमित्ताने झालेल्या काल्याच्या किर्तनात पांगरा येथिल विठ्ठल गडाचे महंत रामकृष्ण शास्त्री यांचे पिरेवाडी येथे किर्तन झाले होते.त्यावेळी आरोपी अंकुश वसंत आघाव याने अतिशय नंगानाच
केला होता.तेथील सप्ताहातील काल्याच्या किर्तनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराची छेड काढली होती.त्या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.परंतु रामकृष्ण शास्त्री महाराज यांच्या मध्यस्थीने ते प्रकरण मिटविण्यात आले होते.अंकुश वसंत आघाव हा अतिशय गुंड आणि मवाली प्रवृत्तीचा आहे.त्याने माणिक दौंडी परीसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे.या भागातील राजकीय पुढाऱ्यांनी मताच्या लाचारी साठी त्याला पाठीशी घातले आहे.अशा गुंडांचा पोलिसांनी कडक समाचार घेऊन त्याच्या वर चांगली जरब बसवली पाहिजे अशी अपेक्षा सामान्य नागरिका तर्फे व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय चलन बनावट पद्धतीने निर्माण करून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा हा कुख्यात देशद्रोही,राष्ट्रद्रोही गुन्हेगार असून त्याला बाहेर सोडणे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धोका निर्माण करणं आहे.अशा देशद्रोही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची वेळीच नांगी ठेचली पाहिजे.आणि भारतीय अर्थव्यवस्था बळकट केली पाहिजे.डोंगराच्या कड्या कपारीत हे गुन्हेगार लपून बसतात आणि आपल्या देशद्रोही कारवायाला घतपाणी घालतात.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.