आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️समाजमन घडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका या चार स्तंभावर लोकशाहीची ताकद अवलंबून आहे. यातील चौथा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम विविध विचारांचे वाहक म्हणून कार्य करत आहे. पत्रकारितेतून लोकांच्या भावना मांडल्या जात असून समाजमन घडविण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन प्राचार्य एस आर मेश्राम यांनी केले. व्हॉईस ऑफ मिडिया तालुका चामोर्शी यांच्या वतीने विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कुनघाडा रै येथे बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी प स सभापती आनंद भांडेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, पोलिस पाटील दिलीप शृंगारपावर, व्हॉईस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर, सचिव विनोद खोबे, पर्यवेक्षक धर्मेंद्र दुधे, प्रा. उल्हास आखाडे, प्रा देवानंद दुधे, प्रा. टीकाराम जेल्लेवार, प्रा. सारिका साळवे, पत्रकार अरुण गव्हारे, धनराज वासेकर, सोनू वाळके, उमेश गझलपल्लीवार, मारोती बारासगडे, प्रफुल कोटांगले, सुधीर गडपायले, दिलखुष कुनघाडकर,शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी अपघातात मृत पावलेल्या अतुल तुळशीराम कोसमशिल्ले यांच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करण्यात आली, शाळेला बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा व शिक्षकांना लेखणी भेट देण्यात आली, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून गौरविण्यात आले,पत्रकारांचा सत्कार आला. पत्रकारांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहावा आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता.केवळ बातम्या देणे हेच पत्रकारांचे काम नसून समाजातील गरजू घटकांना न्याय मिळवून देणे आणि सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणे ही काळाची गरज आहे. असे मत ममान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांनी केले, संचालन सहाय्यक शिक्षक गुरुदास कन्नाके यांनी तर आभार उमेश गझलपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.