▪️युवा सेना शिंदे गट मध्ये युवकांचा पक्षप्रवेश व आढावा बैठक..

श्री राहुल चहांदे – वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा – ( इंडिया 24 न्युज ) : शिवसेनेचे मुख्यनेते मा श्री एकनाथजी शिंदे साहेब युवा सेना कार्याध्यक्ष मा श्री पूर्वेश सरनाईक यांच्या आदेशाने आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी युवासेनेच्या वर्धा जिल्हातील पदाधिकाऱ्यांची कृष्णनगर येथील गाडगे बाबा मंदिर,वर्धा येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला युवा सेना सचिव मा श्री शुभमजी नवले उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला आगामी निवडणका या पूर्ण ताकतीने लढवायच्या असून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची पूर्वतयारीत सिहाचा वाटा असावा या करिता पक्ष संघटनेची बांधणी करण्याचे सूचना श्री. शुभमजी नवले, युवासेना राज्य सचिव यांनी केले.
या बैठकीला शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक श्री. किरणभाऊ पांडव यांनी युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी काळातील मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी युवा सैनिकांनी तयार राहण्याचे आव्हान व्हिडिओ कॉल द्वारे केले.
यावेळी श्री.शुभमजी नवले यांच्या उपस्थितीत जिल्हातुन मोठ्या प्रमाणात युवकांचे पक्ष प्रवेश करून घेतले.यावेळी बैठकीला युवा सेना लोकसभा अध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख- निखिल सातपुते, युवासेना जिल्हा प्रमुख-मंगेश रावेकर, युवासेना जिल्हाप्रमुख-महेश मुडे, देवळी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख- शैलेश रावेकर,उपजिल्हा प्रमुख- मंगेश भोंगाडे,वर्धा, सुरज पिटेकर, आर्वी, अजय वानखेडे,हिंगणघाट जिल्हाप्रमुख, हिंगणघाट शिवसेना शहर प्रमुख प्रशांत लहामगे,रोशन राऊत, वर्धा विधानसभा संघटक तसेच युवासेनेचे वर्धा जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.