ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे ओळखपत्र नि:शुल्कच..

▪️बनावट ओळखपत्रापासून सावध राहण्याचे आवाहन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 04 : महाराष्ट्र‌ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क वितरीत करण्यात येते. पंरतु काही व्यक्ती दलालांमार्फत पैसे घेऊन बनावटी ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) दिले जात असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत. करीता कोणत्याही बांधकाम कामगारांनी सदरील व्यक्ती /दलाला मार्फत बनावटी ओळखपत्र न घेता जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रातून आपले ओळखपत्र (स्माट कार्ड) घ्यावे.

सदर ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) हे निःशुल्क असल्याने कोणाही व्यक्तीस /एजेंट यांना पैसे देऊ नये. तसेच पैशांची मागणी करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आवाहान सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.