▪️महामार्गावरील गिट्टी व उभे मालवहु ट्रक देताहेत अपघातां निमंत्रण..
▪️प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष चामर्शी येथील प्रकार..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चामर्शी आष्टी मार्गवरील चामोर्शी शहरालगतच्या महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे प्रवाशांच्या सुलक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण रुग्णालयाच्या समोरच महामार्गालगत मोठ्या प्रमाणात गिट्टी साठवून ठेवण्यात आली असून रस्त्याच्या दुतर्फा कडेला सुरजागड प्रकल्पाशी संबंधित मालवाहु ट्रक उभे राहत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये जा करतात मात्र दुकानदारांकडून रस्त्यावरच गिट्टी ठेवली जात असल्यामुळे रस्याची रुंदी कमी झाली आहे परणामी दुचाकी चारचाकी तसेच रुग्णवाहिकांना देखील मार्ग काढणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाच्या समोरच ही परिस्थिती असल्याने आपत्कलीन सेवांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असे असल्याचे चित्र दिसत आहे
त्यातच सुरजागड येथूनयेणारे जड मालवाहू ट्रक महामार्गाच्या कडेला तासनतास नेहमीच उभे राहत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था आणि रस्ताच्या कडेला उभे असलेले ट्रक यामुळे लहान मोठ्या अपघातांची शक्यता नेहमीच निर्माण होत असते काही वेळा किरकोळ अपघात घडल्याच्याही घटना स्थानिकांकडून सांगण्यात येत आहेत या संपूर्ण प्रकाराबाबत संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच परिसरातील नागरिकांमध्ये तिब्र संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्गालगत साठवलेली गिट्टी तात्काळ उचलण्यात यावी रस्त्याच्या कडेला मालवाहु ट्रक उभे राहण्यास बंदी घालवी तसेच वाहतूक सुरळीत होण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी परिसरातील नागरिक वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्या भविष्यात मोठा अपघात घफण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

