ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही..

▪️नगध्यक्ष अॅड प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांचा इशारा पोटे गांव मार्गावरील अस्वच्छतेबाबत आक्रमक..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : नगराध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पावलावर पाऊल ठेवत गडचिरोली शहराला अस्वछतेच्या विखळ्यातून बाहेर काढून सुजलाम _ सुफलाम बनविण्याचा ठाम निर्धार नगराध्यक्ष अॅड प्रणोती निंबोरकर यांनी केला आहे केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणान्या या भूमिकेचा प्रत्यय पोटेगाव रोड येथील गंभीर प्रकरणात पुन्हा एकदा दिसून आला
शहरालगत असलेल्या पोटेगाव रोड परिसरात नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातुन संकलित करण्यात आलेला कचरा सर्रासपणे उघड्यावर टाकण्यात येत होता यामुळे त्या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून तीब्र दुर्गधीमुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले होते हा कचरा व दुर्गधी आसपासच्या वस्तीपर्यत पोहोचत असल्याने लहान मुले वृद्ध व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता विशेष म्हणजे याच मार्गावरुन पोलीस भरतीसाठी सरव करणारे विद्यार्थी_ विद्यार्थीनी सकाळ व सायंकाळच्या सत्रात सरावासाठी येतात याशिवाय शहरातील नागरिक मॉर्निंग वॉक , सायंकाळी फिरण्यासाठी याच रस्त्यांच्या वापर करतात अशा ठिकाणी कचय्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांनी व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी वेळ न दवडता घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली परिस्थिती पाहून त्यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला यावेळी त्यांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाय्यांची कोणतीही गय केली जाणार नाही स्वच्छतेबाबत हलर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही नगरपरिषद कर्मचाय्यांना तत्काळ कचरा उचलण्याचे , संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण, भविष्यात अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकला जाणार नाही, यासाठी कठोर व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट आदेश दिले स्वच्छतेच्या कामात हलर्जीपणा करणाय्यांवर कारवाईचे संकेतही यावेळी देण्यात आले
या पाहणीदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पिंदुरकर, अभियंता खामनकर व सफाई कर्मचारी उपस्थित होते नगरध्यक्ष व नगरसेवकांच्या या हस्तक्षेपानंतर तत्काळ स्वच्छता मोहिमेला गति मिळाल्याचे चित्र दिसून आले नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांचा या आक्रमक, ठाम आणि नागरिककेंद्रित भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, गडचिरोली आता केवळ स्वच्छतेच्या घोषणा करणारे शहर राहिले नसून, प्रत्यक्ष कठोर अंमलबजावणीकडे वाटचाल करत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.