▪️स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मूल नगर परिषदेची मुसंडी : जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर..!

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज) : देशाला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी देशातील नागरीकांना स्वच्छतेची सवय लागावी आणि त्यामाध्यमातून जनतेचे आरोग्य निरोगी ठेवण्यास प्रोत्साहन मिळावे. याउद्देशाने भारत सरकारचे शहरी व ग्रामीण विकास मंत्रालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी विविध स्पर्धाचे आयोजन करते.
केद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये मूल शहराने स्वच्छतेच्या दिशेने महत्वपूर्ण प्रगती केली आहे. आज जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या निकालामध्ये मूल शहराने आपल्या स्वच्छतेच्या प्रयत्नांना यश मिळवून एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. या वर्षी मूल शहराने चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत विभागात १ ला, राज्यात ६५ वा व तसेच देशात ११२ वा क्रमांक प्राप्त केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये मूल शहराला ९०८६ गुण प्राप्त झाले असून शहराला ODF++ हे प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झाले आहे.
यापूर्वीही मूल नगर परिषदेला शहराच्या स्वच्छते सोबत नगर सुंदर ठेवण्यासाठी केलेल्या विविध उपक्रमांकरीता राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहे.
ही कामगिरी मूल शहराच्या नागरिकाच्या व नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचारी व सर्व सफाई कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे.
नगर परिषद मूल मुख्याधिकारी श्री. संदीप दोडे यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये मूल शहराला मिळालेले यश हे आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकांच्या आणि नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतिक आहे. मूल शहर स्वच्छ व सुंदर शहर निर्माण करण्याच्या आमच्या सामुहिक दुष्टीकोनाचा हा विजय आहे.भविष्यात स्वच्छतेच्या बाबतीत आणखी सुधारणा करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे. यामध्ये नागरिकांनी घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण ओला व सुका कचरा स्वरुपात द्यावेत व स्वच्छतेबाबत नागरिकांनी सहकार्य करावे .हि अपेक्षा व्यक्त केली आहे .असे केल्यावर मूल नगर परिषद देशात अव्वल पहिल्या ५० स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये झेप घेईल, असा विश्वास मा. मुख्याधिकारी यांनी दर्शविला. भविष्यातही आम्ही हेच सातत्य राखत स्वच्छतेमध्ये अधिक उंची गाठण्याचा प्रयत्न करू,असे मत आमच्या सोबत विशेष वार्तालाप करताना व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकिय निधी मधून नगर प्रशासनाने स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्यासाठी मूल शहरात विविध योजना सोबतच सार्वजनिक शौचालयांची निर्मिती, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी द्वारा कचरा संकलन, स्वच्छतेसंबंधी कर्मचाऱ्यांनी केलेली जनजागृती आणि त्याकरीता नागरीकांचा सक्रिय सहभाग मिळविण्यात नगर प्रशासनातील मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. त्यांच्याच परिश्रमातून केंद्र सरकारने घेतलेल्या २०२४ या वर्षीच्या स्वच्छ व सुंदर शहर स्पर्धेत मूल नगर परिषदेने जिल्हयात पहिला येण्याचा सन्मान मिळविल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे.
जिल्हयात अस्तित्वात असलेल्या विविध नगर परिषदांमधें मूल नगर परिषद माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभा क्षेत्रात येते. त्यामूळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन उपलब्ध होत असते तसेच विकास निधी खेचून आणण्यासाठी विशेष सहकार्य मिळत असते .तसेच या नगरप्रशासनाचा कार्यभार सांभाळणाऱ्या आधिच्या सर्व मुख्याधिकारी यांनी केलेल्या प्रयत्नांचा देखील याप्रसंगी उल्लेख करणे आवश्यक आहे.
त्याची दखल घेत मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी नगरप्रशासनाचे प्रशासक व उपविभागीय अधिकारी अजय चरडे , यांचेसह मूल शहरातील आधीचे मुख्याधिकारी ,मूल शहरातील नागरिक व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन करीत आभार मानले आहे.