▪️भद्रावती पोलीसानी ठोकल्या बेड्या.. ट्रॅक्टर साहित्याची चोरी करणारा गजाआड..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्डात घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे स्टार्टर सेल्फ, बॅटरी व इतर साहित्याची चोरी करणाऱ्या चोराला भद्रावती पोलिसांनी तपास करीत अटक करीत चोरलेले साहित्य व आरोपीची दुचाकी वाहन असा एकूण 47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्डात राहणारे भारत नागपूरे दिनांक 30/4/2025 रोजी रात्रौ 11 वाजता सुमारास आपल्या मालकीची स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक MH – 34 BG 0271 ही शेतीचे काम करून संध्याकाळी आपले घराचे अंगनासमोर उभी केली असता दुस-या दिवशी सकाळी शेतीचे कामाकरीता ट्रॅक्टर सुरू केली असता ट्रॅक्टर सुरू न झाल्याने ट्रक्टरची पाहणी केली असता ट्रॅक्टरमधील स्टाटर सेल्फ, बॅटरी, लोखंडी सेंटींग पट्टा व लोखंडी रोटावेटरचे पट्टे असे ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट असा एकुण 17,900 रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी गेल्याचे लक्षात येताच भारत नागपूरे यांनी भद्रावती पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप क. 197/2025 कलम 303 (2) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करूण तपास सुरू करण्यात आला.
भद्रावती पोलीस तपास करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की सुरज उर्फ गोलू भैयाजी किन्नाके (25 वर्ष) रा. फुकट नगर भद्रावती ता. भद्रावती जि. चंद्रपुर याने चोरी केली असल्याची माहिती मिळाली, दरम्यान भद्रावती पोलिसांनी दिनांक 27 जून 2025 रोजी संशयित आरोपी सुरज किन्नाके याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली देवुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेले ट स्टाटर सेल्फ अंदाजित किंमत 5,000 रुपये, ट्रॅक्टरची बॅटरी किंमत 10,000 रुपये, ट्रक्टरची लोंखडी सेंटींग पट्टा किंमत 1500 रुपये, ट्रॅक्टरचे लोखंडी रोटावेटरचे 14 पट्टे किंमत 1400 रुपये व आरोपीची एक जुनी वापरती काळया रंगाची होन्डा शाईन मोटर सायकल MH – 34 Y 0253 किंमत 30,000/- रू (गुन्हयात वापरलेली वाहन) असा एकुण 47,900/- रू. चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास पो.हवा. जगदीश झाडे करीत आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात पो.नि. योगेश्वर पारधी, गुन्हे शोध पथकातील पो.उप.नि. गजानन तुपकर, सफौ. महेन्द्र बेसरकर, पो.हवा. अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोळे, पो.स्टे. भद्रावती यांनी केली.