ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️जखमी चौसिंगा हरिणला दिले जिवनदान..
▪️डॉ. संदिप छौंकर पशुधन विकास अधिकारी यांचेकडून घडली समाजसेवा..

डॉ.आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो.क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : आज दि.२८ जून २०२५ ला सकाळी ९:१५ चे दरम्यान मूल गडचिरोली रोडवर आकापुर गावाच्या एक कि.मी.समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मादी चौसींगा हरीण जखमी झाले. माहिती मिळताच वनरक्षक एस.डब्लु.बोनलवार , संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, दिनेश खेवले, मनोज रणदिवे हे घटनास्थळी उपस्थित झाले व पशुधन विकास अधिकारी डॉ.संदिप छौनकर यांनी जखमी मादि चौसींगा हरीण वर प्राथमिक उपचार केले.
त्यानंतर जखमी चौसींग्याला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले व सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे यांचे सूचने नूसार पूढील उपचारासाठी चंद्रपूर प्राणी उपचार केंद्रात पाठविन्यात आले.