▪️भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू..
▪️मुल पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ ) : मुल वरून चंद्रपूरकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ जुलैच्या रात्री मुल तालुक्यातील जानाळा गावाजवळ घडली.गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील दीपक बोडेले (३८) हे एमएच ३४ बीयू ५००३ क्रमांकाच्या दुचाकीने चंद्रपूरकडे येत असताना जानाळा गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की मृताच्या शरीराचे तुकडे झाले.मुल पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मुल चंद्रपूर मार्गावर मधोमध खड्डे पडल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटून तो खाली पडला आणि नकळतपणे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला चिरडले असेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केले.मुल पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत.