आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️1 ते 7 ऑगस्ट पर्यंत साजरा होणार महसूल सप्ताह – तहसिलदार मृदुला मोरे

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727

मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : तहसील स्तरीय महसुली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे, महसूल गोळा करणे तसेच संबंधित कामे उत्कृष्ट पध्दतीने करणा-या व महसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांचा सत्कार करण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
तसेच महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
असे राहील महसूल सप्ताहाचे स्वरुप : 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईल. महसूल संवर्गातील कार्यरत /सेवानिवृत्त अधिकारी -कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण व लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ.
2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप कार्यक्रम.
3 ऑगस्ट रोजी पाणंद/ शिवरस्त्यांची मोजणी करून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे.
4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे.
5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून अनुदानाचे वाटप करणे.
6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्काषित करणे.
7 ऑगस्ट रोजी एम. सँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मूलच्या तहसिलदार मृदुला मोरे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.