▪️वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी..

डॉ. आनंदराव कुळे
मुल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मुल तालुक्यातील मूल बफर वनपरिक्षेत्रातील काटवन बिट क्र.७५९मध्ये गुरे चारण्या करीता गेलेल्या मौजा काटवन येथील परशुराम मडावी वय (६० ) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना आज दिनांक ३० जुलै २०२५ रोजी दुपारी ३. ०० वाजेच्या दरम्यान घडली. घडलेल्या घटनेची माहीती होताच वनविभागाचे पि आर टी पथक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लागलीच जखमी परशुराम मडावी यांना उपजिल्हा रूग्णालय मूल येथे उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सुरु आहे.या वन परिक्षेत्रात नरभक्षी पट्टेदार वाघ फिरत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, गुराखी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात वाघाने अनेकांचा बळी घेतला असून कित्येक शेतकऱ्यांना आणि जनावरांना गंभीर जखमी केलेले आहे.वनविभागाने तात्काळ संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा, अशी परिसरातील नागरिकांची रास्त मागणी आहे.