▪️किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रम..
▪️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता आज वाराणसी येथे आयोजित..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : लक्कडकोट, ता. राजुरा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली साकार झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता आज वाराणसी येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात देशभरातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या औचित्याने आयोजित तालुकास्तरीय कार्यक्रमास लक्कडकोट येथे उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
- या उपक्रमाद्वारे, देशभरातील सुमारे ९.७० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २०,५०० कोटी रुपये थेट जमा करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असलेले मोदी सरकार त्यांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी सतत काम करत आहे. या योजनेद्वारे, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशी भावना याठिकाणी बोलताना मनोगतातून व्यक्त केली.
या कार्यक्रमाला माझ्यासमवेत तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन, सरपंचा सजनाबाई आत्राम, रत्नाकर गादगीवार, श्रीनिवास उत्नुरवार, ग्रामसेवक मिश्रा, पो.पा. दिनकर आडे, रघुनाथ गेडाम, गंगाराम आडे, कृष्ण कोडापे, रवी दुर्गे, नितीन बानकर, भीमराव मडावी, विजय कावळे यांचेसह स्थानिक शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.