आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणे गरजेचे – किशोर टोंगे

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

वरोरा- ( इंडिया 24 न्यूज ) : आधुनिक युग हे इंटरनेट व तंत्रज्ञानाचे आहे आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी करून घ्यावा . आनंद निकेतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा आजघडीला पुणे येथील यशस्वी उद्योजक किशोर टोंगे हे आनंद निकेतन महाविद्यालयात शेती प्रश्न आणि उपाय या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होते.अर्थशास्त्र विभागाद्वारे संविधान दिनाच्या पर्वावर आयोजित या कार्यक्रमात मंचावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.मृणाल काळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नरेंद्र पाटील , निकेश सामने पाटील अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापक वैद्य उपस्थित होत्या ते पुढे म्हणाले की इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे त्याचा उपयोग सरकार योजना मिळविण्यासाठी आणि आपले प्रश्न सोडविण्यासाठी केला पाहिजे स्टार्टअप योजनेमुळे युवा उद्योजकांसाठी फार चांगली संधी आहे जग आज भारताकडे मोठ्या आशेने पहात आहे. ओयो हॉटेल इंडस्ट्रीचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले की आजच्या युगात तंत्रज्ञानामुळे कल्पकतेतून कमी भांडवलाचे उद्योग सुरू करता येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाला सर्वोत्तम देण्यासाठी नवीन कल्पनांवर विचार केला पाहिजे
याप्रसंगी विशेष अतिथी निकेश पाटील आमने यांनी देखील आपले विचार मांडले. शेती माती आणि संस्कृती या तिन्ही शिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे त्यामुळे सर्वच गोष्टींना आपण महत्त्वपूर्ण दिले पाहिजे आजची परिस्थिती बदलण्यासाठी आपण संघर्ष करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले प्रेमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजनाने झालीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी संचालन कुमारी पल्लवी जीवतोडे हिने तर आभार प्रदर्शन कुमारी दडमल हिने केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.