▪️केसरीमल पालीवाल विद्यालयाचे स्तुत्य उपक्रम..
▪️चिमुकल्यांनी तयार केलेल्या राख्या कारगिलच्या जवानांना..

दिनांक 5/8 2025
राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
पारशिवनी – ( इंडिया 24 न्युज ) : देशाच्या सीमेवरील रक्षणासाठी तत्पर असलेल्या भारतीय जवानांकरता राख्या तयार करून केसरीमल पालीवाल विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी बहिन भावाचे प्रेम व भारतीय जवानांना प्रति असलेले आदर व प्रेम व्यक्त केले विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव दीपक बाबू पालीवाल अध्यक्ष म्हणून उपस्थित होते सैन्य दलातील अधिकारी कॅप्टन पल्लव गजानन पोटभरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या सौ. हिमांगी पोटभरे मॅडम,उपप्राचार्या सौ चित्रा कहते मॅडम पर्यवेक्षक दुधाराम शंभरकर उपस्थित होते कॅप्टन श्री पल्लव पोटभरे यांनी सैन्य दलातील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यालयाचे सचिव श्री दीपक पालीवाल यांनी कॅप्टन पोटभरे यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार केला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या त्यांच्या माध्यमातून ह्या कारगिल येथील जवानांपर्यंत पोहोचणार आहेत याचा आनंद व अभिमान असल्याचे मत दीपक पालीवाल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविका देऊन चित्रा कहाते यांनी अतिथींचा परिचय व ओळख करून दिली सूत्रसंचालन मनोज धोंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश पालीवाल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विकास ढोबळे,रोशन लेंडे, रंजना चौकसे,आरती पालीवाल,विद्या परतेकी, अशोक नगरे यांनी प्रयत्न केले.